केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना फोन, दबाव टाकला जातोय - नाना पटोले

Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीकरिता महाविकास आघाडीची रणनिती तयार आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करत आहेत. दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोप  नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. 

Updated: Jun 18, 2022, 11:57 AM IST
केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना फोन, दबाव टाकला जातोय - नाना पटोले title=
संग्रहित छाया

मुंबई : Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीकरिता महाविकास आघाडीची रणनिती तयार आहे. शिवसेना नेते खासदार संजय संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अपक्ष येऊन भेटले त्यामुळे अपक्षांचा विषय आता संपला आहे. आमच्या उमेदवारांकडे गरजेपेक्षा जास्त मतं आहेत, असे सांगत केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करत आहेत. दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. या फोनचे रेकॉर्डींग आमच्याकडे आहे, असे ते म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीकरिता विरोधकांना 22 मतं हवी आहेत.पण एवढी मतं त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, पैशांचा वापर  यांचा उपयोग आता भाजपला होणार नाही, असा टोला पटोले यांनी हाणला. त्याचवेळी ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करतायेत, दबाव टाकला जातोय याचं रेकॉर्डींग आमच्याकडे आहे.

महाविकास आघाडीतल्या आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन केले जात आहेत. स्विस बँकेत 2 वर्षांत 212 टक्के पैसे वाढले आहेत. मात्र, काँग्रेसला बदनाम केले जात आहे. आता सत्ता आणि पैसे कोणाकडे आहे ते सगळ्यांना माहिती आहे. भाजपचा काळा चेहरा समोर आला आहे, असे नाना पटोले म्हणाले.  ठेकेदारीने सैन्यभरती करण्यात येत आहे. अग्निपथवरुन तरुण विरोधात आहे. ही भाजपच्या पराभवाची सुरुवात आहे, असे नाना पटोले म्हणाले.