सिंधुदुर्ग : मालवणमध्ये मच्छिमारांच्या आंदोलनात आमदार नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवरच अरेरावी केल्याचा प्रकार उघड झालाय. यावेळी बाचाबाचीनंतर अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला. त्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला.
पर्सिसन नेटविरोधात मालवणमध्ये मच्छिमारांनी आंदोलन केलेय. यावेळी मत्सव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या कार्यालयात मासे घेऊन आयुक्तांना घेरले.मत्सव्यवसाय आयुक्तांना घेरल्यानंतर झालेल्या शाब्दीक चकमकीक नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांवर अरेरावी करत मासा फेकून मारला.
मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब आमदार नितेश राणे यांनी विचारला. यावेळी राणे यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली. तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत. नीट कामे करत जा. आम्ही जनतेला काय उत्तर देणार, असा हल्लाबोल राणे यांनी यावेळी केला.
आयुक्तांसोबत चर्चा सुरु होती. मासेमारी बंद असताना हे मासे कोठून आले, असे विचारले असता मी सांगितले होते का, मासेमारी करायला, असे उत्तर आयुक्तांनी दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासा फेकून मारला.