मिरा-भाईंदर : पर्यावरणाचं संतुलन राखायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात आता सिमेंटचं जगल वाढत आहे. अशा परिस्थितीत राहिलेली झाडं वाचवणं महत्त्वाचं आहे. पण यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी आता मिरा-भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले यांनी पुढाकार घेतला आहे.
आज मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध उद्याने, मैदानांची आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी सालासर हनुमान उद्यान, राणी लक्ष्मीबाई उद्यान, महाराणा प्रताप उद्यान तसेच मुर्धा बाल उद्यान, मूर्धा स्मशानभूमी, मुर्धां दफनभूमी, मुर्धां राम मंदिर तलाव उद्यान, मुर्धां गावदेवी उद्यान येथील विविध कामे करणे याबाबत प्रत्यक्ष कामांची स्थळ पाहणी करून सर्व कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.
शहर वनीकरण, शहर सुंदर करणे, पर्यावरणाच्या सुधार यामध्ये वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे, प्रत्येक ठिकाणी आवश्यतेनुसार आणि गरजेनुसार नियोजन करून शहरातील हरीत क्षेत्र वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून झाडांची लागवड करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. अशी माहिती प्र. उप मुख्य उद्यान अधिक्षक श्री. हंसराज मेश्राम यांनी दिली आहे.