मुस्लिम आरक्षणासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात मंत्रालयात बैठक; अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ उपस्थित

 अजित पवारांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात बैठक बोलावलीय. मंत्रालयात ही बैठक होत आहे. यामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 21, 2023, 05:38 PM IST
मुस्लिम आरक्षणासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात मंत्रालयात बैठक; अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ उपस्थित  title=

Muslim Reservation In Maharashtra : राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण तसेच इतर आरक्षणावरुन वाद सुरु असतानाच आता  मुस्लिम आरक्षणाचा विषय चर्चेत आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, मुस्लिम आरक्षणाबाबत भाजपची भूमिका वेगळी असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मुस्लिम आरक्षणासंदर्भात अजित पवारांनी  बोलावली बैठक 

मुस्लिम आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली आहे. मंत्रालयात ही बैठक होत आहे. मात्र, या बैठकीवरुन वाद होण्याची शक्यता आहे. मुस्लीम आरक्षणाबद्दल भाजपची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे अजितदादांच्या या पुढाकारामुळे वाद होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि अब्दुल सत्तारही मंत्रालयात दाखल झाले आहेत.

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची असाउद्दीन ओवेसी यांची घोषणा

मराठा समाजाने संघटन शक्तीच्या बळावर आरक्षण मिळवले. त्याच पद्धतीने निवडणुकीनंतर आपणही रस्त्यावर उतरुन रस्ते बंद पाडून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याची घोषणा, एम आय एम खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी केली. औरंगाबादमधल्या सभेत बोलताना केली होती. आमदार वारिस पठाण यांनी विधानसभेत मुस्लीम आरक्षणाची मागणी केली होती. 
मराठा समाजाचं आरक्षण उच्च न्यायालयात टिकल्यावर आता मुस्लीम समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.