Chandrakant Patil : हिंमत असेल तर समोर या, चंद्रकांत पाटील यांचं ओपन चॅलेंज

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.  

Updated: Dec 10, 2022, 07:14 PM IST
Chandrakant Patil : हिंमत असेल तर समोर या, चंद्रकांत पाटील यांचं ओपन चॅलेंज title=

पिंपरी चिंचवड :  "मी कार्यक्रमाला चाललोय. सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. कुणाला घाबरत नाही.  पराचा कावळा करणं योग्य नाही. केलेल्या वक्तव्याचं 3 वेळा स्पष्टीकरण दिलं. दिलगिरी व्यक्त केली.  अरे हिंमत असेल तर समोर या", असं थेट आव्हानच मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शाई फेकणाऱ्यांना दिलं आहे. पाटील शाईफेकीनंतर माध्यमांशी बोलत होते. (minister chandrkant patil says im dont fear anyone after ink was thrown on face at pimpri chinchwad)

चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यातील वातावरण तापलं. विरोधकांनी ठिकठिकाणी पाटलांच्या वक्तव्याचा विरोध करत निदर्शन केली.  यानंतर पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली तसेच माफी मागितली. त्यानंतर आता पाटलांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.   

पाटील काय म्हणाले होते?

"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते.  10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचा या वक्तव्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.