अमरावती : महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांची आई इंदिराबाई बाबाराव कडू यांचे (84) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Minister Bachchu Kadu's mother passes away)
आईचे निधन झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी ट्विट करुन दिली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी सकाळी 10 वाजता बेलोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई स्व. इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.
अंत्यविधी:- १३-०३-२२ रविवार
बेलोरा ता. चांदुर बाजार जि. अमरावती
सकाळी १० वाजता pic.twitter.com/4AnpdQXBj4— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 12, 2022
बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister Bachchu Kadu) आहेत. आईच्या निधनाची माहिती मिळताच बच्चू कडू अमरावतीवरून गावाला पोहोचले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या आयुष्याला वळण देणारी माझी आई मला सोडून गेली, याचे मोठे दु:ख आहे. दुपारी आईच्या निधनाबाबत त्यांनी हे ट्विट केले. त्यानंतर बेलोरा येथे जाण्यासाठी निघाले.