'माथेरानची राणी' वाफेच्या इंजिनवर धावणार?

वळणा-वळणाच्या मार्गावर वाफेच्या इंजिनाची मागणी पर्यटकांकडून वारंवार केली जात होती

Updated: Apr 11, 2018, 11:35 PM IST
'माथेरानची राणी' वाफेच्या इंजिनवर धावणार? title=

नेरळ : माथेरानच्या प्रेमात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक सुखावणारी बातमी... माथेरानच्या सृष्टीसौंदर्याबरोबरच आणखी एक आकर्षण म्हणजे माथेरानची मिनी ट्रेन... आता ही मिनी ट्रेन वाफेच्या इंजिनावर चालविण्याची तयारी सुरू आहे... आज वाफेच्या इंजिनाची चाचणी घेण्यात येणार आहे... ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

त्यासाठी कोळशाऐवजी डिझेल इंजिनचा वापर केला जाणार आहे. पूर्वी कोळशाच्या इंधनावर वाफेचे इंजिन चालवले जात होते. पण कोळशामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यामुळे कोळशाऐवजी डिझेलचा वापर केला जात आहे.

वळणा-वळणाच्या मार्गावर वाफेच्या इंजिनाची मागणी पर्यटकांकडून वारंवार केली जात होती, त्याअनुषंगानं मध्य रेल्वेने याबाबत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.