'तो' एक निर्णय महाविकास आघाडीला महागात पडणार; MIM च्या इम्तियाज जलील यांनी केली मोठी घोषणा

2012 साली नांदेड महापालिकेत 12 नगरसेवक निवडून आणून एम आय एम ने महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री केली होती. आता  MIM नवी राजकीय खेळी खेळणार आहे.   

वनिता कांबळे | Updated: Oct 18, 2024, 07:17 PM IST
'तो' एक निर्णय महाविकास आघाडीला महागात पडणार; MIM च्या इम्तियाज जलील यांनी केली मोठी घोषणा  title=

MIM In Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा पोट निवडणुकीची घोषणा झाली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने नांदेड मध्ये पोट निवडणूक होत आहे. कालच काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर होताच एम आय एम चा महाराष्ट्रातील चेहरा असलेले माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोठी खेळी केली. नांदेड लोकसभा निवडणूक आपण लढणार असल्याचे जलील यांनी जाहीर केले.

हे देखील वाचा... मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवार यांनी जाहीर केले बड्या नेत्याचं नाव

जलील यांनी महाविकास आघाडीकडे काही जागांची मागणी केली होती. पण मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी आता प्रेशर प्रॅक्टिस सुरू केल्याचे दिसत. आपण महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता पण त्यांनी तो नाकारला आता भुगता असे जलील यांनी स्पष्टपणे सांगितले

मागच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एम ने नांदेडमध्ये उमेदवार दिला नव्हता. पण पोट निवडणूक लढण्याचे जलील यांनी सांगितले आहे. त्यामुळे साहजिकच मत विभाजनाचा फायदा भाजपला होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पण सांप्रदायिक ताकदिना फायदा होऊ नये यासाठी एम आय एम ने उमेदवार उभे केले नव्हते. पण निवडणुकीनंतर कोल्हापूर येथे झालेला प्रकार असेल की रामगिरी महाराज यांचे वक्तव्य या विरोधात महाविकास आघाडीने स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आमचा आवाज संसदेत पाठवण्यासाठी जलील यांनी नांदेड ची पोट निवडणूक लढवावी असे आवाहन आम्ही केल्याचे एम आय एम तर्फे सांगण्यात आले. जलील यांनी नेहमीच मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे जरांगे जलील यांना पाठींबा देतील अशी आशा एम आय एम ने व्यक्त केली. 

जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची चूक करू नये. मुस्लिम मतांचे विभाजन करून भाजपला फायदा होणारय. नांदेडमध्ये निवडणूक लढवून नांदेडचे वातावरण खराब करू नये असा सल्ला काँग्रेसने दिलाय. जलील यांनी महाविकास आघाडीत घेण्याची मागणी केली होती. ही पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा करणे म्हणजे केवळ महाविकास आघाडीवर दबाव आणण्यासाठी स्टंट आहे अशीही टीका काँग्रेसने केलीये

नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा म्हणजे इम्तियाज जलील यांचा महावीकास आघाडीवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे की खरंच जलील पोटनिवडणूक लढवणार हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तूर्तास मात्र नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत एम आय एम ची एन्ट्री झाल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या असणार तर महाविकास आघाडीचे टेन्शन मात्र वाढल्याचे दिसत आहे.