मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल 'या' वेळेत धावणार

Mumbai Local Train Update: वेस्टर्न रेल्वेवर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचबरोबर आता मध्य रेल्वेनेही ब्लॉक आयोजित केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 27, 2023, 01:33 PM IST
मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल 'या' वेळेत धावणार title=
Mega Block On Western Railway local 5 trains cancelled on October 27

Mumbai Local Train Update:  मध्य रेल्वेने टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर घोषित करण्यात आलेल्या ब्लॉकमुळं या वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं रात्री उशीरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे. 

टिटवाळा ते कसारादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी शनिवारी आणि रविवारी मध्ये रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री 9.30 वाजता सुटणार आहे. त्याचबरोबर रात्रीच्या काही फेऱ्याही रद्द होणार आहेत. 

टिटवाळा ते कसारा दरम्यान शनिवारी रात्री 12.30 ते रविवारी पहाटे 5.30 दरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वेवर होणार आहे. शनिवारी आणि रविवारी रद्द करण्यात आलेल्या लोकलची यादी पुढीलप्रमाणे. 

शनिवारीः सीएसएमटी-कसारा : रात्री १०.५०, सीएसएमटी-कसारा : रात्री १२.१५

रविवारीः कल्याण-आसनगाव : पहाटे ५.२८, कसारा-सीएसएमटी : पहाटे ३.५१, कसारा-सीएसएमटी : पहाटे ४.५९ 

शनिवारी शेवटची लोकलः सीएसएमटी-कसारा: रात्री ९.३२, कल्याण-कसारा: रात्री ११.०३, कसारा-कल्याण: रात्री १०.०० पर्यंत धावणार आहेत. तर, रविवारी कल्याण-कसारा: पहाटे ५. ४८ तर, कसारा-कल्याण: पहाटे ६.१० ला धावणार आहे. 

मध्य रेल्वेवर ब्लॉक का?

एमआरव्हीकडून कसारा पादचारी पुलासाठी एन आकाराचा गर्डर उभारणी. उंबरमाळी ते कसारादरम्यान दोन ठिकाणी पुलाचे गर्डर उभारणे अशी कामे रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहेत. आसनगाव ते आटगावदरम्यान रेल्वे फाटकावरील पुलाचे गर्डर उभारणे व खडवली ते वाशिंददरम्यान सिग्नल संबंधिक यांत्रिक कामे करणे, अशी कामेही करण्यात येणार आहेत. 

मेल एक्स्प्रेसच्या वेळेवरही होणार परिणाम 

गाडी क्रमांक 12106 गोंदिया-सीएमएमटी विदर्भ एक्स्प्रेस गोंदियावरुन तीन तास उशीराने धावणार आहे. अमरावती, देवगिरी, मंगला, पंजाबमेल, नागपूर दुरांतो पाटलीपुत्र, अमृतसर, हातिया, महानगरी, कुशीनगर, शालीमार, हावडा, नंदीग्राम, छपरा आणि बलिया एक्स्प्रेस विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळेवर परिणाम होणार आहे.