Measles Outbreak in Maharashtra : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे. (Maharashtra News in Marathi) दरम्यान, गोवरला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. तसेच गोवर प्रतिबंधासाठी राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्याकडून देण्यात आले आहेत.
गोवरमुळे आतापर्यंत एकूण 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गोवरचा संसर्ग हाताबाहेर जात असल्यानं लक्षात आल्यानंतर सरकार खडबडून जागं झाले आहे. राज्य सरकारने 11 डॉक्टरांचा राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला आहे. डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स काम करेल. आरोग्य मंत्रालयाने हे आदेश दिलेत.
गोवरला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केलाय. तीन दिवसांत 14 हजार मुलांना मिझेल रूबेला डोस देण्यात येणार आहे. ज्या भागात गोवरचा फैलाव सर्वाधिक आहे, त्या भागातल्या मुलांना मिझेल रूबेला लसीचा अतिरिक्त डोस टोचण्यात येणार आहे. गोवरचा सर्वाधिक प्रभाव जुहूगाव, सीबीडी, बेलापूर, करावे, पावणे या भागातील तीन महिने ते पाच वर्षे वयोगटातील १४ हजार मुलांचं लसीकरण होणार आहे. मिझेल रूबेलाचं हे अतिरिक्त लसीकरण तीन दिवसांत ८३ सत्रांमध्ये होणार आहे.
- ताप
- खोकला
- घसा दुखणं
- अंग दुखणं
- डोळ्यांची जळजळ होणं
- डोळे लाल होणं
- 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येणं
ज्या बालकांना लस देण्यात आलेली नसते अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता असते. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसंच लसीकरण न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवर होऊ शकतो.