मंत्रालयातील जलसंधारण विभाग आता शिफ्टमध्ये काम करणार; कोरोना प्रतिबंधासाठी कौतुकास्पद पाऊल

 मंत्रालयातील जलसंधारण विभागाने कोरोना काळात दोन शिफ्टमध्ये काम करण्याची व्यवस्था केली आहे.  

Updated: Mar 13, 2021, 11:30 AM IST
मंत्रालयातील जलसंधारण विभाग आता शिफ्टमध्ये काम करणार; कोरोना प्रतिबंधासाठी कौतुकास्पद पाऊल title=

मुंबई : मंत्रालयातील जलसंधारण विभागाने कोरोना काळात दोन शिफ्टमध्ये काम करण्याची व्यवस्था केली आहे.  

सोमवारी 15 मार्च पासून कर्मचाऱ्यांना शिफ्ट मध्ये येण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

अशा असतील शिफ्ट

पहिली शिफ्ट सकाळी आठ ते चार 

दुसरी शिफ्ट दुपारी बारा ते आठ 

या वेळेत कोणते कर्मचारी येणार याची यादी विभागाकडून बनवण्यात आली आहे.
कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जलसंधारण विभागाने हे पाऊल उचलले  आहे.