Alibaug PNP Drama Hall Fire : अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये लगत (Alibaug PNP Drama Hall Fire) असलेल्या नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे.

Updated: Jun 15, 2022, 06:06 PM IST
Alibaug PNP Drama Hall Fire : अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये लगत (Alibaug PNP Drama Hall Fire) असलेल्या नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे.  पीएनपी नाट्यगृहाला आग लागली आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. नाट्यगृहाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळतायेत. नाट्यगृहाला आग लागल्याचं समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली. (massive fire at pnp theater in alibaug no casualties)

संध्याकाळी 5 च्या दरम्यान ही आग लागल्याचं सांगितंल जातंय.  या नाट्यगृहात वेल्डिंगचं काम सुरु होतं. या कामादरम्यान ही आग लागल्याचं म्हटलं जातंय. या आगीत सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी तसेच कोणीची जखमी झालेलं नाही. मात्र नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं आहे. 

आगीत नाट्यगृहातील खुर्च्या, छत, साउंड सिस्टीम या आणि अशा विविध वस्तुंचं नुकसान झालंय. दरम्यान ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.