कोकणातील पहिल्या सैनिक स्मारक उद्यानाचे लोकार्पण

कोकणातील पहिले शहीद जवान स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथे उभारण्यात आलेय.    

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 2, 2018, 11:13 AM IST
कोकणातील पहिल्या सैनिक स्मारक उद्यानाचे लोकार्पण title=

मुंबई : कोकणातील पहिले शहीद जवान स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथे उभारण्यात आलेय. याचे उद्धघाटन लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार विनय सहस्त्रबुध्दे, परमवीर सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यावेळी उपस्थित होते. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने हे शहीद जवान स्मारक, सैनिक मानवंदना उद्यान उभारण्यात आले आहे. या स्मारकात परमवीरचक्र प्राप्त वीरांचा इतिहासही उपलब्ध होणार आहे. हे स्मारक आता सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

 देवरुखात शहीद जवान स्मारक, परमवीरचक्र दालन आणि सैनिक मानवंदना उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोकणातील असा हा पहिलाच प्रकल्प आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचा अभिनंदनीय उपक्रम, आहे असे गौरवोउद्गार शेकटकर यांनी काढलेत. दरम्यान, या उपक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्र पाठवून शुभेच्छा दिल्यात.

शहीद जवान स्मारकासाठी दिल्ली संरक्षण मंत्रालयाने टी -५५ बजरंग हा रणगाडा दिला आहे. १९६५ ते १९७५ च्या युद्धात हा रणगाडा वापरण्यात आला होता. हा रणगाडा पुणे येथून देवरुखला आणण्यात आला आहे. तो या स्मारकात ठेवण्यात आलाय. तसेच एक तोफही आहे. शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी, नव्या पिढीला इतिहास माहीत व्हावा, यासाठी हे शहीद जवान स्मारक, परमवीरचक्र दालन, सैनिक मानवंदना उद्यान उभारण्यात आलेय. तसेच या स्मारकात परमवीरचक्र प्राप्त वीरांचा इतिहासही उपलब्ध होणार आहे.