धक्कादायक प्रकार, बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लावले लग्न

  राजावाडीत बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार ठाकूर समाजाने जातपंचायीने केल्याचे उघड झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2018, 05:29 PM IST
धक्कादायक प्रकार, बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लावले लग्न title=

नाशिक : जिल्ह्यातल्या राजावाडीत बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार ठाकूर समाजाने जातपंचायीने केल्याचे उघड झाले आहे.

आरोपी शिवा येलेवार याने जातीतल्याच अल्पयीन मुलीवर बलात्कार केला. जायतपंचायतीने आरोपीला गुन्हा कबूल करायला लावून पीडित मुलीशी लग्न लावून देण्यास भाग पडले. 

मात्र त्यानंतर १५ दिवसांत पीडित कुटुंबाल वाळीत टाकत आरोपीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. झी २४ तासने हा प्रकार उघड केल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. 

ठाकूर समाजाच्या जातपंचायतीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.