अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी केले हे आरोप

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या. त्यासोबतच पोलीस यंत्रणेतील काही अधिका-यांवर धक्कादायक आरोपही केलेत.

Updated: Mar 8, 2018, 01:07 PM IST
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी केले हे आरोप title=

कोल्हापूर : पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या. त्यासोबतच पोलीस यंत्रणेतील काही अधिका-यांवर धक्कादायक आरोपही केलेत.

केला हा आरोप

कोल्हापुरात अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस यंत्रणेमधील काही अधिकारी आरोपींना मदत करत आसल्याचा आरोप केलाय. तर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात घेण्यात यावं, अशी मागणीही कुटूंबीयांनी केलीये. तसेच अश्विनीच्या हत्येच्या तपासात आरोपी अभय कुरुंदकर याचा भाऊ पोलीस संजय कुरुंदकर हा ढवळाढवळ करत आसल्याचा आरोपही करण्यात आलाय.

काय केल्या मागण्या? 

- ACP संगीता शिंदे आल्फान्सो यांची नियुक्ती तपास पूर्ण होवून चार्जसीट दाखल होई पर्यंत होणे गरजेचे आहे 

- ACP संगीता शिंदे आल्फान्सो यांना तपासासाठी स्वतंत्र अधिकार देण्यात यावा.

- वर्सोवा खाडीत अश्विनीच्या मृतदेहाच्या शोध मोहीमेत खाजगी एजन्सीची मदत घ्यावी.

- आरोपीला मदत करणाऱ्या मुंबई पोलीस कमिशनर हेमंत नगराळे यांना सहआरोपी करावे..