मुहूर्ताच्या काही क्षणांपूर्वी वधूने पोलिसांना बोलावून स्वत:चे लग्न रोखले, म्हणाली - मैं किसी और को....

 ज्यावेळी एका तरुणीचा विवाह (Marriage) होत होता आणि सात फेरे घेण्यापूर्वी चक्क वधूने (bride) तिचेच लग्न रद्द केले. कारण...

Updated: Jul 15, 2021, 01:07 PM IST
मुहूर्ताच्या काही क्षणांपूर्वी वधूने पोलिसांना बोलावून स्वत:चे लग्न रोखले, म्हणाली - मैं किसी और को.... title=

मुंबई : असं म्हणतात की, कितीही बंधने घातली तरी प्रेम काही थांबत नाही, अशीच एक घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात समोर आली आहे. ज्यावेळी एका तरुणीचा विवाह (Marriage) होत होता आणि सात फेरे घेण्यापूर्वी चक्क वधूने (bride) तिचेच लग्न रद्द केले. कारण तिला होणारा वर (groom) आवडत नव्हता. कारण ती दुसऱ्यावर प्रेम करत होती. लग्नाच्या बोहल्यावर चढणाऱ्या तरुणीने फोन करुन पोलिसांनाही बोलावले. त्यानंतर वराच्या घरातील मंडळी संतप्त झाली आणि मंडपातच जोरदार वाद सुरु झाला. 

एका तरुणीने आपले लग्न रद्द करण्यासाठी शेवटच्या क्षणी पोलिसांना फोन केला आणि स्वत:चे लग्न मोडले. तिने असे म्हटले की, ज्या मुलाशी (groom) लग्न करणार होती. तो मुलगा तिला आवड नव्हता. मात्र, असे असताना लग्न बंधनात का अडकायचे, असे सांगत लग्नाला विरोध करत आपले लग्नच मोडले.

मंगळवारी दुपारी 12 वाजता हा विवाह रामटेकजवळील रिसॉर्टमध्ये होणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, मुहूर्ताच्या काही क्षण आधी या तरुणीने पोलीस कंट्रोल रूमवर फोन केला आणि सांगितले की, तिला या वराबरोबर लग्न करायचे नाही. कारण तिचे दुसर्‍या कोणावर प्रेम आहे.  

वधुने नकार दिल्यानंतर वराच्या कुटुंबातील लोक संतप्त झाले. त्यामुळे जोरदार वाद होऊन जोराचे भांडणे झाले. इन्स्पेक्टर प्रमोद मकेश्वर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांना रामटेक पोलीस ठाण्यात नेले. यानंतर वराच्या कुटुंबातील  संतप्त झालेले लोक शांत झाले आणि हे लग्न रद्द केले. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका आठवड्यापूर्वी या तरुणीने आपल्या आईला सांगितले होते की, तिने तिच्यासाठी निवडलेल्या माणसाशी लग्न करायचे नाही. असे असताना लग्न लावले जात होते.