नाशिकमध्ये बाजार समितीचे व्यवहार ठप्प, आठवडी बाजार सुरु

 शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत. संपाचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आठवडी बाजार सुरु असल्याने थोडासा दिला मिळालाय.

Updated: Jun 7, 2017, 09:45 AM IST
नाशिकमध्ये बाजार समितीचे व्यवहार ठप्प, आठवडी बाजार सुरु title=

नाशिक :  शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत. संपाचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आठवडी बाजार सुरु असल्याने थोडासा दिला मिळालाय.

मात्र गोदेतीरी असणाऱ्या आठवडी बाजारात शेतकरी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी दाखल झालेत. त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळालाय. तिकडे पुणे मार्केट यार्डात तर आज गेल्या सात दिवसातली सर्वाधिक आवक बघायला मिळत आहे. 

दररोज सरासरी १२०० गाड्या माल पुणे मार्केट यार्डात येतो. आज त्यापैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक गाड्या बाजारात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राचं कृषी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतेयं. आज कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत आज बारा हजार क्लिंटल आवक नोंदवण्यात आलीय. हाच आकडा आठ हजार आठशे अठ्ठ्यांशी क्विंटल इतका होता. दररोज सुमारे अठरा हजार क्विंटल माल कोल्हापुरात येतो.