मराठवाड्यात गड आला पण.....

निकालाच्या सर्व अपडेट्स 

Updated: Oct 24, 2019, 11:31 PM IST
मराठवाड्यात गड आला पण.....  title=
विधानसभा निवडणूक : गड आला पण.....

मुंबई : राज्यातील राजकारणात अतिशय प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अशा कुटुंबांपैकी मुंडे घराण्यातील भावा- बहिणीची जोडी म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकेमेकांसमोर उभे ठाकले. पंकजा या भाजपच्या वतीने तर, धनंजय हे राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवत होते. या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना पिछाडीवर टाकत परळीचा गड राखला. यंदाच्या वर्षी गंगाखेड मतदारसंघातील निकालाने सर्वांनाच धक्का दिला. 

बंडखोर उमेदवार रत्नाकर गुट्टे गंगाखेडमधून निवडून आले. रासपमधून निवडणुकीच्या रिंगणात उइतरलेल्या गुट्टे यांनी थेट कारागृहातून विधानसभा निवडणुकीत त्यांचा सहभाग नोंदवला. गुरुवारी सकाळपासूनच निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता अनेक मतदार संघांचं चित्र स्पष्ट झालं. अब्दुल सत्तार, संतोष दानवे, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार, हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या मतदार संघात विजयोत्सव साजरा केला. एकंदरच यंदाची पक्षीय लढत पाहता मराठवाड्यानेही ही निवडणूक विशेष गाजवली. 

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी 

मुखेड - तुषार राठोड (भाजप)

भोकर - अशोक चव्हाण (काँग्रेस)

वसमत - चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)

उदगीर - संजय बनसोडे (काँग्रेस)

लातूर शहर - अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)

लातूर ग्रामीण - धीरज विलासराव देसमुख (काँग्रेस)

बीड - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)

औरंगाबाद पूर्व : अतुल सावे (भाजप)

पैठण- संदीपन भुमरे (शिवसेना)

गंगापूर - प्रशांत बंब (भाजप)

वैजापूर - रमेश बोरणारे (शिवसेना)

परळी - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)

देगलूर- रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)

किनवट - भिमराव केराम (शिवसंग्राम महायुती)

नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर (शिवसेना)

नांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे (काँग्रेस)

हदगाव - माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)

लोहा - श्यामसुंदर शिंदे (शेकाप)

हिंगोली - तानाजी मुटकुळे (भाजप)

जिंतूर- मेघना बोर्डीकर (भाजप)

माजलगाव - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)

केज - नमिता मुंदडा (भाजप)

आष्टी - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)

तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील (भाजप)

परंडा - तानाजी सावंत (शिवसेना)

उस्मानाबाद - कैलास पाटील (शिवसेना) 

उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना)

जालना - कैलास गोरंट्याल (काँग्रेस)

नायगाव - राजेश पवार (रिपाई)

बदनापूर - नारायण कुचे (भाजप)

अहमदपूर - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)

परतूर - बबनराव लोणीकर (भाजप)

उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना)

परभणी - राहुल पाटील (शिवसेना)

निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)

कन्नड - उदय सिंग राजपूत (शिवसेना)

फुलंब्री - हरिभाऊ बागडे (भाजप)

गंगाखेड- रत्नाकर गुट्टे (रासप)

औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाठ (शिवसेना)

औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल (शिवसेना)

भोकरदन - संतोष दानवे (भाजप)

गेवराई - लक्ष्मण पवार (भाजप)

सिल्लोड - अब्दुल सत्तार (शिवसेना)

औसा - अभिमन्यू पवार (भाजप)

तुळजापूर मतदारसंघ- राणाजगजितसिंह पाटील भाजप

परंडा- तानाजी सावंत- शिवसेना

उस्मानाबाद- कैलास पाटील- शिवसेना

उमरगा- ज्ञानराज चौगुले- शिवसेना

घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी)

कळमनुरी - संतोष बांगर (शिवसेना)

'जनतेने मला स्वीकारलं नाही', पंकजा मुंडेंकडून पराभवाचा स्वीकार

..............

पाहा आतापर्यंतच्या अपडेट्स.... 

सायंकाळी ५.३० वाजता : जिंतूर विधानसभा मतदार संघातून मेघना बोर्डीकर विजयी 

दुपारी ४.२० वाजता : माजलगावमधून राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके विजयी 

दुपारी ४ वाजता : केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा ३२९८३ मताधिक्याने विजयी

दुपारी ३.३७ वाजता : बीड, आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे विजयी, भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या गडात भाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार भीमराव धोंडे पराभूत

दुपारी ३.३६ वाजता : उस्मानाबाद जिल्ह्यात चारही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी

दुपारी ३.३३ वाजता : जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर पराभूत; काँग्रेसचे कैलास गोरंट्याल विजयी 

दुपारी ३.१४ वाजता : नांदेड नायगावमध्ये रिपाईचे राजेश पवार विजयी, तर बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे विजयी 

दुपारी ३.१० वाजता : अहमदपूरमधून राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील विजयी, जालना परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर विजयी

दुपारी ३.०५ वाजता : उमरगा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले विजयी

दुपारी ३ वाजता : तुळजापूरमधून भाजपचे राणा पाटील ९९,०३४ मतांनी विजयी 

दुपारी २.५० वाजता :  परभणीतून आमदार राहुल पाटील दुसऱ्यांदा विजयी

दुपारी २.४० वाजता : निलंगा मतदारसंघातून भाजप नेते, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर ३२ हजार ३६३ मतांनी विजयी, सख्खे काका अशोक पाटील निलंगेकर यांचा सलग दुसऱ्यांदा केला पराभव.

दुपारी २.२४ वाजता :  औरंगाबादमध्ये शिवसेनेला ६ जागा, भाजपला ३ जागा 

दुपारी २.१५ वाजता : कन्नडमधून शिवसेनेचे उदय सिंग राजपूत विजयी, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे विजयी

दुपारी २.०० वाजता : रासपचे रत्नाकर गुट्टे विजयी

दुपारी १.३२ वाजता : औरंगाबाद पश्चिम येथून शिवसेनेचे संजय शिरसाठ विजयी

दुपारी १.३२ वाजता : औरंगाबाद मध्य येथे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विजयी

दुपारी १.३० वाजता : जालना, भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र विजयी

दुपारी १.२० वाजता : लक्ष्मण पवार ६९०१ मतांनी विजयी 

दुपारी १.०५ वाजता : पंकजा मुंडे पराभूत ; धनंजय मुंडेंनी राखला परळीचा गड 

दुपारी १.०० वाजता : सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार २७ हजार मतांनी विजयी. सत्तार यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा पराभव केला. 

दुपारी १२.४० वाजता : बीडमधून पहिला निकाल हाती, बीड गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार विजयी. 

दुपारी १२.३५ वाजता : उस्मानाबादमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका. 

दुपारी १२.२५ वाजता : औरंगाबाद जिल्हा, शिवसेना ५ जागांवर, भाजप २ जागांवर आणि एमआयएमकडे २ जागांवर आघाडी

दुपारी १२.१५ वाजता :  औरंगाबाद सिल्लोड मतदार संघातून अब्दुल सत्तार १३ हजार २३७ मतांच्या आघाडीवर.

दुपारी १२.१५ वाजता : जालना घनसावंगी दहाव्या फेरीत शिवसेनेच्या हिकमत उढाण ६०९० मतांनी आघाडीवर

दुपारी १२.१० वाजता :  नांदेड उत्तमध्ये शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर ९००० मातांनी आघाडीवर

दुपारी १२.०२ वाजता : औरंगाबाद पूर्वमध्ये हिंदू प्रभागातील मतमोजणीस सुरुवात. सावे आघाडीवर असणाऱ्या गफ्फार कादरी यांना टक्कर देत आहेत. 

सकाळी ११.३० वाजता : बीड आष्टी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे १४ हजार मतांनी आघाडीवर

सकाळी ११.२७ वाजता : सिल्लोड मतदार संघात अब्दुल सत्तार यांच्याकडे १७ हजार ९५८ मतांची आघाडी 

सकाळी ११.२५ वाजता : लातूर औसामधून भाजपचे अभिमन्यू पवार सातव्या फेरीअखेर ८४४८ मतांनी आघाडीवर. तर, दहाव्या फेरीत जालना परतूर मतदार संघातून बबनराव लोणीकर यांना ८५८० मतांची आघाडी 

सकाळी ११.२० वाजता : आष्टी विधानसभा मतदार संघात दहाव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे १५ हजार ५१८  मतांनी आघाडीवर भाजपाचे भीमराव धोंडे पिछाडीवर 

सकाळी ११.१२ वाजता : औरंगाबाद जिल्हा शिवसेना ६, भाजप २ आणि एमआयएम एका जागेवर पुढे

सकाळी ११.०९ वाजता : नांदेड भोकर, दहाव्या फेरीअखेर अशोक चव्हाण यांना ४१ हजार १६४ मतांची आघाडी 

सकाळी ११.०६ वाजता :  अकराव्या फेरीअखेर धनंजय मुंडे १८ हजार २०१६ मतांनी आघाडीवर 

सकाळी ११.०५ वाजता : जालना बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे ९ हजार ९१२ मतांनी आघाडीवर 

सकाळी ११.०० वाजता : दहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे १३ हजार ३३ मतांनी आघाडीवर 

सकाळी १०.४१ वाजता : परळी मतदार संघातून पंकजा मुंडे मोठ्या फरकाने पिछाडीवर. धनंजय मुंडे यांच्याकडे ९६३८ मतांची आघाडी 

सकाळी १०.४० वाजता : लातूर निलंगा मतदार संघातून संभाजी पाटील निलंगेकर १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर 

सकाळी १०.३५ वाजता : एमआयएमचे गफार कादरी यांच्याकडे आघाडी. जालन्यात पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे कैलास गोरंटयाल २ हजारहून जास्त मतांनी पुढे, तर खोतकर पिछाडीवर

सकाळी १०.३३ वाजता : जालना घनसावंगी सेनेचे हिकमत उढाण २८८ मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे नेते टोपे यांची पिछाडी. जालना परतूर मतदार संघात सहाव्या फेरीत भाजपचे लोणीकर ६ हजार ६९२ मतांनी आघाडीवर

सकाळी १०.३३ वाजता : लातूर अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील हे चौथ्या फेरी अखेर ९००० मतांनी आघाडीवर, भाजपचे विनायकराव पाटील पिछाडीवर

सकाळी १०.३० वाजता : जालना घनसावंगी सेनेचे हिकमत उढाण २८८ मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे नेते टोपे यांची पिछाडी

सकाळी १०.२५ वाजता : जालना परतूर मतदार संघात सहाव्या फेरीत भाजपचे लोणीकर ६ हजार ६९२ मतांनी आघाडीवर

सकाळी १०.२० वाजता : लातूर अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील हे चौथ्या फेरी अखेर ९००० मतांनी आघाडीवर, भाजपचे विनायकराव पाटील पिछाडीवर

सकाळी १०.१५ वाजता : कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून सहाव्या फेरीत शिवसेनेचे संतोष बांगर ५८७८मतांनी आघाडीवर. जालन्यात भोकरदन, भाजप संतोष दानवे २ हजार ४९६ मतांनी पुढे

सकाळी १०.१५ वाजता : नांदेडमधून अशोक चव्हाणांकडे २५०३८ मतांची आघाडी. लातूर-  निलंगा मतदार संघात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे पाचव्या फेरी अखेर जवळपास १० हजार १०० मतांनी आघाडीवर.

सकाळी १०.१३ वाजता : औरंगाबाद फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे पुढे, औरंगाबाद पूर्व, एमआयएमचे गफ्फार कादरी पुढे. बीड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर आघाडीवर

सकाळी १०.१० वाजता : औरंगाबाद मध्य आणि पैठणमध्ये अनुक्रमे प्रदीप जैस्वाल, संदिपन भुमरे पुढे. वैजापूरमध्ये शिवसेनेचे रमेश बोरणारे पुढे, तर औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाठ पुढे. गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब पुढे. दुसरीकडून सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार पुढे

सकाळी १०.०५ वाजता : औरंगाबाद पूर्व, एम आय एमच्या गफ्फार कादरी याना ३१ हजार मतांची आघाडी, भाजपचे मंत्री अतुल सावे प्रचंड पिछाडीवर. सावेंना पहिल्या फेरीअखेर फक्त ७१२ मतं

सकाळी १०.०५ वाजता : परळीत आतापर्यंत ५५९८९ इतकी मतं मोजली गेली आहेत. यात धनंजय मुंडे यांना २९१६७, तर पंकजा मुंडे यांना २३१४९ मतं. धनंजय मुंडे सहा हजारहून अधिक मतांनी आघाडीवर. जालन्यात तिसऱ्या फेरीअखेर सेनेचे खोतकर १ हजार ६९२ मतांनी आघाडीवर

सकाळी १०.०० वाजता : आष्टी विधानसभा पाचवी फेरी राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे ६७६७ने आघाडीवर भाजपाचे भीमराव धोंडे पिछाडीवर

सकाळी १०.०० वाजता : परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना- राहुल पाटील ७४७३, अपक्ष- सुरेश नागरे ७१३, काँग्रेस - रविराज देशमुख- ६५९ 

सकाळी ९.५८ वाजता : भोकरदनमध्ये संतोष दानवे पिछाडीवर 

काळी ९.५५  वाजता : गंगाखेडमध्ये पाचव्या फेरीच्या अखेर शिवसेनेचे विशाल कदम ५६६४ मतांनी आघाडीवर

सकाळी ९.५२  वाजता :  उस्मानाबाद दुसऱ्या फेरी अखेर परंडा मतदारसंघातुन शिवसेना 1669 मतांनी आघाडीवर

सकाळी ९.५२  वाजता : उस्मानाबाद उमरगा विधानसभा ज्ञानराज चौगुले शिवसेना तिसऱ्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडी वर

सकाळी ९.५०  वाजता : जालना:घनसावंगी,दुसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे हिकमत उढाण 316 मतांनी आघाडीवर,राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांची पिछाडी

सकाळी ९.४६ वाजता : लातूर  निलंगामधून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर. तर परळीत धनंजय मुंडे यांच्याकडे चार हजारहून जास्त मतांची आघाडी 

सकाळी ९.४६ वाजता : बीड, शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर १०१० मतांनी आघाडीवर 

सकाळी ९.४१ वाजता : जालना- भोकरदन, भाजपचे संतोष दानवे तिसऱ्या फेरीअखेर ८०० मतांनी आघाडीवर. चौथ्या फेरी अखेर तुळजापूर मतदारसंघातुन भाजपचे राणाजगजितसिंह ५८८३ मतांनी आघाडीवर

काळी ९.४० वाजता : औरंगाबाद पूर्व एम आय एमचे गफ्फार कादरी पंधरा हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे अतुल सावे पिछाडीवर

सकाळी ९.४० वाजता : नांदेड उत्तर शिवसेनेचे बालाजी कल्याणकर २३००मतांनी आघाडीवर

सकाळी ९.३१ वाजता : परळी विधानसभा मतदार संघात चौथ्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे ३५४१ मतांनी पुढे 

सकाळी ९.३१ वाजता : नांदेड- देगलूरमधून तिसऱ्या फेरीच्या अंती काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर १९६३ मतांनी आघाडीवर

सकाळी ९.३० वाजता : उमरगा मतदारसंघातुन शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले १२०० मतांनी आघाडीवर

सकाळी ९.३० वाजता : औरंगाबाद पश्चिम पहिल्या फेरीत संजय शिरसाठ आघाडीवर

सकाळी ९.२८ वाजता : बीड आष्टी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे २८०० मतांनी आघाडीवर 

सकाळी ९.२८ वाजता : लातूर शहर विधानसभा मतदार संघातून दुसऱ्या फेरीअखेर अमित विलासराव देशमुख आघाडीवर

सकाळी ९.२५ वाजता : लातूर - अहमदपूर मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील पहिल्या फेरी अखेर ८९३ मतांनी आघाडीवर. तर, हिंगोली वसमत विधानसभेत राष्ट्रवादी- २२७८, शिवसेना ४११७ 

सकाळी ९. १८ वाजता : औरंगाबाद सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्ता पाच हजार मतांनी पुढे 

सकाळी ९. १८ वाजता : औरंगाबाद पूर्व भाजपचे राज्यमंत्री अतुल सावे पिछाडीवर, एमआयएमचे गफ्फार कादरी आघाडीवर 

सकाळी ९.१७ वाजता : परळी मतदार संघात धनंजय मुंडे ९६४४, पंकजा मुंडे ७९९० मतं. धनंजय मुंडे आघाडीवर. 

सकाळी ९.०९ वाजता :  प्रमुख लढत पाहायला मिळत आहे, आ. संतोष टारफे ( काँग्रेस )३९३०, संतोष बांगर ( शिवसेना ) ५५८३, अजित मगर ( वंचित बहुजन आघाडी ) ३४७६, यामध्ये संतोष बांगर १६१५ मतांनी आघाडीवर

सकाळी ९.०९ वाजता : लातूर - उदगीर मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, तर  लातूर - अहमदपूर मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील आघाडीवर.

सकाळी ९.०९ वाजता : औरंगाबाद मध्य शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल १५९१ मतांनी आघाडीवर

सकाळी ९.०७ वाजता : लातूर शहर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार अमित विलासराव देशमुख तर लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज विलासराव देशमुख आघाडीवर.

सकाळी ९.०० वाजता : गंगाखेडमध्ये रापसचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर 

सकाळी ८.५४ वाजता : धनंजय मुंडे ४७९५ मतांनी पुढे; पंकजा मुंडे ४२१६ मतांवर 

सकाळी ८.५१ वाजता : पहिल्या फेरीत बीडमधून संदीप क्षीरसागर यांच्याकडे ३३९ मतांची आघाडी, तर परंडा मतदार संघातून शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना १६९० मतांची आघाडी 

सकाळी ८.४४ वाजता : थोड्याच वेळात जालन्यातील सर्व जागांचे निकाल हाती येणार 

सकाळी ८.४३ वाजता : औरंगाबाद गंगापूर मतदार संघात प्रशांत बंब यांच्याकडे आघाडी

सकाळी ८.४२ वाजता : औरंगाबाद पैठण मतदार संघातून शिवसेनेचे संदीपन भुमरे आघाडीवर 

सकाळी ८.४१ वाजता : धनंजय मुंडेंना तब्बल एक हजार मतांची आघाडी. 

सकाळी ८.२८ वाजता : हदगावमधून नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना) ९०० मतांनी आघाडीवर, तर नायगावमधून वसंत चव्हाण ( काँग्रेस) ५५० मतांनी आघाडीवर

सकाळी ८.२७ वाजता : मुखेडमधून तुषार राठोड( भाजप) ८०० मतांनी पुढे, देगलूर येथे सुभाष साबणे ( शिवसेना) यांच्याकडे ३०० मतांची आघाडी

सकाळी ८.२७ वाजता :  लोहातून श्यामसुंदर शिंदे( शेतकरी कामगार पक्ष ) यांच्याकडे ४५० मतांची आघाडी

सकाळी ८.२७ वाजता : नांदेड दक्षिण मतदार संघातून साबेर चाऊस (एमआयएमच्या)यांच्याकडे आघाडी, नांदेड उत्तरमधून फेरोज लाला ४०० मतांनी आघाडीवर

सकाळी ८.२७ वाजता : भाजपचे भीमराव केराम ४५० मतांनी आघाडीवर

सकाळी ८.२७ वाजता : औरंगाबाद येथे टपाल मतमोजणीला सुरुवात. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपाचे अतुल सावे आघा़डीवर  

सकाळी ८.२६ वाजता : लातूर शहर आणि लातूर ग्रामीण येथे पोस्टल मतमोजणाला सुरुवात 

सकाळी ८.२५ वाजता : जालना, घनसावंगी येथे पोस्टल मतमोजणीला सुरुवात 

सकाळी ८.२२ वाजता : भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण आघाडीवर 

सकाळी ८.२२ वाजता : पंकजा मुंडे आघाडीवर 

सकाळी ८.१९ वाजता : पोस्टल मतमोजणीत बीडमधून शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आघाडीवर 

सकाळी ८.१७ वाजता : उस्मानाबाद येथील पोस्टल मतमोजणीला सुरुवात 

सकाळी ७.५५ वाजता  : पोस्टल मतमोजणीला सुरुवात 

सकाळी ७.५२ वाजता : थोड्याच वेळात मतमोजणीस सुरुवात 

२०१४च्या निवडणुकांचे निकाल पाहता, या ठिकाणी शिवसेना- भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. मागील निवडणुकांमध्ये मराठवाड्यात युतीला ४६ पैकी २६ जागा मिळाल्या होत्या. त्यात केंद्रातही मोदींची सत्ता आल्यामुळे अर्थातच युतीचा यावेळीसुद्धा या मतदार संघांमध्ये मोठ्या यशाची अपेक्षा आहे. तर, काँग्रेस या ठिकाणी पुन्हा एकदा पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नांत दिसेल.