'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका

Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले. 

राजीव कासले | Updated: Nov 30, 2023, 01:41 PM IST
'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका title=

Maratha vs OBC Reservation : गेल्या दोन दिवसात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा पाहणी दौरा आयोजि करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांनी आज नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पण ठिकठिकाणी त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून छगन भुजबळ शाहपूरसाठी रवाना झाले. येवल्यातील सोमठाण देश गावात मराठा समाजानं (Maratha Samaj) मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्याचा निषेध केला. ज्या रस्त्यानं भुजबळांचा ताफा गेला त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडण्यात आलं.

भुजबळांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी सोमठाण देश गावातील मराठा आंदोलक सकाळपासूनच  एकत्र आले होते. भूजबळांना गावात प्रवेश न देण्याचा निर्धार या आंदोलकांनी घेतला. त्यासाठी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. मराठा समाजाच्या विरोधानंतर भुजबळांनी सोमठाणदेशचा दौरा टाळला. मात्र त्यांचा ताफा ज्या रस्तानं गेला त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडण्यात आलं.. तसंच आंदोलकांनी अर्धनग्नहोत भुजबळांना काळे झेंडेही दाखवले.

मराठा समाज आक्रमक
छगन भुजबळ ज्या ठिकाणी भेट देत आहेत तिथे मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडलंय. भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध होतोय. भुजबळांच्या येवला दौ-याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय. लासलगावातील सोमठाणं देश या गावातील गावक-यांनी दुकानं बंद ठेवत भुजबळांच्या दै-याला विरोध दर्शवलाय. सोमठाण देश गावातील गावक-यांचा विरोध पाहता भुजबळांनी त्यांच्या दौऱ्याचा मार्ग बदलला.

मनोज जरांगेंची बोचरी टीका
मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा भुजबळांचा एकेरी उल्लेख केलाय. नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणी दौऱ्यावरून जरांगेंनी टीका केलीय. भुजबळ बांधावर कशाला जातो, शेतकऱ्याचं पीक आणखी खराब होईल त्याची सावलीही पडू देऊ नये कुणावर असा माणूस असल्याची टीका जरांगेंनी केलीय. छगन भुजबळ हे पनवती असून, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे

छगन भुजबळांचा दौरा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी येवल्यामध्ये गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमीवर आज ते पाहणी दौरा करतायत. शेतकऱ्यांच्या बांधावर जात भुजबळांनी त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यावेळी त्यांनी अधिका-यांना तातडीनं पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.