बीड : बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणा-या परतीच्या पावसाने शेतक-यांची दैना केलीय. हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हैराण झालाय.
जिल्ह्यात यंदा साडेतीन लाख हेक्टरवर कापूस, अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. पावसानं साथ दिल्याने शेतकरीही खुश होता.
पीक जोमात असल्याने कापसाच्या वेचणीला लागून दिवाळी गोड करण्याचे स्वप्न तो बघत होता. मात्र गेल्या परतीच्या पावसानं बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलंय, तर कापसाच्या वाती झाल्या आहेत.