'फडणवीसांवर एवढं प्रेम आहे तर...', मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याच टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांची जीभ घसरली आहे. प्रसाद लाड यांच्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.

Updated: Jul 18, 2024, 07:10 PM IST
'फडणवीसांवर एवढं प्रेम आहे तर...', मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ title=

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगेंचा तोड सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केली. प्रसाद लाड माझ्या नादी लागू नको. अशा शब्दात जरांगेंनी लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

जरांगे नेमकं काय म्हणाले? 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील हे 20 जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत. त्या दिवशी मराठा समाजाची बैठक किती तारखेला घेयची हे ठरवले जाणार आहे. मराठा शांतता रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारला असता जरांगे म्हणाले की, मराठा समाज ज्या दिवशी बैठकीला एकत्र येईल. त्या दिवशी मराठा समाजाला विचारून ठरवलं जाईल. 288 निवडून आणायचे की पाडायचे. असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल

जरांगे यांना देवेंद्र द्वेष हा रोग झालाय असं म्हणणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर देखील जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. 400 ते 500 मुलांना ठाण्यात कुणबी प्रमाणपत्र असताना बाहेर काढलं आणि ओपन कॅटगरीमध्ये टाकलं. प्रसाद लाड यांना जर खरचं मराठ्यांची आस्था असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं पाहिजे असं जरांगे म्हणाले.  यावेळी त्यांनी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका मुलाचे कुणबी प्रमाणपत्र देखील माध्यमांसमोर दाखवले आहे. 

फडणवीस यांना इशारा

यावेळी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील इशारा दिला आहे. तुम्ही मराठ्यांचे आमदार, मंत्री अंगावर घालू नका. मराठा-मराठ्यांमध्ये मारामारी लावू नका. फडणवीस साहेब मी तुम्हाला गोडीत सांगतोय. याआधी देखील तुम्हाला सांगितलं आहे. ही चौथी वेळ आहे आता तुम्हाला सांगायची. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत. थेट तुमच्याकडे निघतील. त्यामुळे तुम्ही भांडण लावून आमची मजा बघू नका. मराठे खवळले तर तुमची गय करणार नाहीत. असा इशाराच जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिला आहे. 

जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा शांतता रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हा रॅलीचा टप्पा सोलापूर येथून सुरु होणार असून त्याचा समारोप नाशिकमध्ये होईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय. लाड यांच्या टीकेवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तू देवेंद्र फडणवीस यांचे पॅन्ट शर्ट काढून बघ, त्याला कुठला रोग झाला आहे ते.? असं त्यांनी म्हटलं आहे.