अनोख्या मातृप्रेमाची प्रचिती, आईच्या पार्थिवासाठी मुलांचा लढा

आजकाल वृद्ध आई- वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे कृतघ्न मुले आपण समाजात पाहतो. मात्र मृत्यूनंतरही आपली आई (Mother)आपल्या जवळच राहावी यासाठी एका मुलांनी (Son) कायदेशीर लढाई लढली. 

Updated: Dec 19, 2020, 06:27 PM IST
अनोख्या मातृप्रेमाची प्रचिती, आईच्या पार्थिवासाठी मुलांचा लढा  title=

मनमाड : आजकाल वृद्ध आई- वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे कृतघ्न मुले आपण समाजात पाहतो. मात्र मृत्यूनंतरही आपली आई (Mother)आपल्या जवळच राहावी यासाठी एका मुलांनी (Son) कायदेशीर लढाई लढली. काही दिवासांपूर्वी दफन केलेल्या आईचे शव कबर खोदून आपल्या मुळगावी दफन केल्याची घटना मनमाडमध्ये घडली. त्यांनी आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण केली. (Son Fulfilled Mothers Last Wish Of Cremation)

मंजुलता वसंतराव क्षीरसागर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने मालेगावच्या कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. तेथे त्यांची २२ सप्टेंबर रोजी सकाळी कोरोना टेस्ट घेण्यात आली. मात्र अहवाल येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. आई गेल्याने दोन्ही मुले शोकसागरात बुडाले. आपल्या मृत्यूनंतर आपला दफन विधी मनमाड या मूळ गावीच करावा, अशी आईची इच्छा होती. 

ही आईच्या इच्छा (Mother's wish) पूर्ण करण्यासाठी मुलाला कायदेशी लढा द्यावा लागला. कारण मुलांनी आईचा शव मनमाडला घेऊन जाऊन अंतविधी करतो, म्हणून प्रशासन अधिकाऱ्यांच्या विनवण्या केल्या. अधिकाऱ्यांनी याला नकार दिला. दुसऱ्या दिवशी ख्रिस्ती धर्म परंपरेनुसार मालेगावच्या नामपूर रोडवरील ख्रिस्ती कब्रस्तानामध्ये त्यांचा दफनविधी करण्यात आला. तर तिसऱ्या दिवशी या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता काय करायचे आईचा दफनविधी तर केला  गेला, या पेचात मुलगा सुहास आणि संदीप पडला. दुसरा मार्गच नाही. 
आपली आई आपल्या जवळच पाहिजे या भावनेमुळे मुलांचे अंतःकरण व्याकुळ झाले. या मुलांनी आईचा कबरीतला देह मिळावा म्हणून  महानगरपालिका प्रशासनाकडे अर्ज केला. अर्ज पाहून प्रशासनही चक्रावले. तब्बल पावणे तीन महीने विविध ऑफिसच्या पायऱ्या झिजवल्या. हा नाही करत शासकीय आणि धार्मिकेची पूर्तता केली असता, अखेर आईवरील मुलांचे प्रेम पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तब्बल पावणे तीन महिन्यानंतर शव स्थलांतराची परवानगी दिली. आई गेल्याचे दुःख आणि आई जवळ आल्याचा आंनद अशी द्विधा स्थिती मुलांमध्ये होती. 

 माझ्या आईची इच्छा होती, माझा दफनविधी स्थानिक ठिकाणीच व्हावा. यासाठी मी दोन महीने लढ़ा लढलो आणि यात यशस्वी झालो. महापालिका, संबधित अधिकारी, पोलीस, प्रशासन तसेच तहसीलदार यांच्या परवानग्या घेतल्या. त्यानुसार मालेगाव येथून आईचे दफन केलेला शव काढून मनमाड येथे कब्रस्तानमध्ये दफन केला, अशी माहिती मुलगा सुहास क्षीरसागर याने दिली.

काय योग असतो ना, दोनदा दफनविधी या माऊलीच्या नशिबी लिहिलेला होता. हे जरी खरे असले तर या घटनेच्या निमित्ताने क्षीरसागर बंधूचे आनोख्य मातृप्रेमाची प्रचिती या निमित्ताने आली.