UPSC Maharashtra Topper: संगमनेरच्या एका चहावाल्याचा मुलगा यूपीएससी उत्तीर्ण झाला आहे. मंगेश खिलारे (Mangesh Khilere) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. मंगेशची आई विडी कामगार आणि वडील चहाचा ठेला चालवतात. संगमनेरजवळच्या सुकेवाडी गावातून मंगेशनं शिक्षण घेतलs. मोलमजुरी करत, उसने पैसे घेत त्याच्या आईवडिलांनी त्याचं शिक्षण पूर्ण केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 396 वा येत मंगेश यूपीएससी उत्तीर्ण झाला. UPSC परीक्षेत बाजी मारत मंगेशने आई वडिलांच्या कष्टांचे चीज केले आहे.
यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालामध्ये मंगेश 396 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. मंगेशने हे यश कसं मिळवलं, त्याचा जीवनातील आदर्श कोणता, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सोशल मीडियापासून दूर राहणं किती आवश्यक त्याचप्रमाणे त्याला मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेला सर्वात चांगला प्रश्न कोणता होता या सगळ्यांविषयीची त्याने मुलाखतीत दिलखुलास उत्तर दिली आहेत.
मंगेश अवघा 23 वर्षांचा आहे. यूपीएससीसाठी तयारी करत असताना तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळवल आहे. विशेष म्हणजे शासकीय नोकरीत या उच्च पदाला गवसणी घालणारा मंगेश हा त्याच्या कुटुंबातील पहिलाच मुलगा आहे. त्यामुळे त्यांनं मिळवलेल्या या यशाचं त्याच्या घरच्यांबरोबरच गावाकडील सगळ्यांनाच कौतुक आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून मंगेश पुण्यात आला होता. पुण्यातील युनिक अकॅडमीचा तो विद्यार्थी आहे. मुलगा कुठल्यातरी मोठ्या परीक्षेची तयारी करतोय यापेक्षा त्याच्या आईला फारसं काही माहीत नाही किंबहुना कळतही नाही. समाजात वावर असल्यानं असल्यानं वडिलांना स्पर्धा परीक्षा आदींची जेमतेम माहिती आहे. मुलगा यूपीएससी परीक्षा पास झाल्याचं कळतात त्यांना खूप आनंद झाला. निकालाची यादी वेबसाईटवर धडकतात मंगेशन पहिला फोन त्यांनाच केला. हा प्रसंग खिलारे कुटुंबासाठी अच्युतम आनंदाचा होता.
मंगेशची आई विडी कामगार आहे. विड्या वळणे किंवा बांधण्याचं काम त्या करतात. त्या कामातून दिवसाकाठी 100 ते 200 रुपये मिळतात. घरी थोडीशी शेती आहे. परंतु उत्पन्न नावालाच. त्यामुळे मंगेश चे वडील चहाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळतात.
घरी असलेली बिकट आर्थिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आई-वडील करत असलेले काबाडकष्ट हेच मंगेशच्या यशामागील प्रेरणा म्हणता येतील. त्याने संघर्ष केवळ पाहिला नाही तर तो प्रत्यक्ष अनुभवलाय. असं असलं तरी मंगेशच्या आई-वडिलांनी त्याला किंवा त्याच्या बहिणीला कधीच विड्या बांधण्यासाठी बसवलं नाही. त्याऐवजी त्यांनी मुलांच्या हातात पाटी पेन्सिल दिली. त्यामुळे आपले आई-वडील हेच आपले आदर्श असल्याचं मंगेश अभिमानांना सांगतो.
यूपीएससीची तयारी करत असताना प्रयत्नांमधील सातत्य महत्त्वाचं असतं. अभ्यास करत असताना संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास डोळ्यासमोर ठेवायचा असतो. मंगेशनं त्याकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. अपयश आलं तरी खचून जायचं नाही, जिद्द सोडायची नाही, आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही हाच सल्ला मंगेश त्याच्या मित्र-मैत्रिणींना देतो.
अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आपल्या लक्ष्यापासून विचलित होत असल्याचं आवर्जून आवर्जून जाणवतं. सोशल मीडिया आहे त्यामागचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे मुलांनी सोशल मीडियाचा मर्यादित वापर करावा किंबहुना त्यापासून दूर राहावं असा सल्ला मंगेश देतो.
यूपीएससीचं क्षेत्र खूप विस्तीर्ण असं आहे. आयएएस झाल्यानंतर सेवेचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मंगेशला त्यातील ग्रामविकास मध्ये रस आहे. मातीशी नाळ जोडून असणं म्हणतात ते हेच. तुझ्या जीवनातील आदर्श कोण, असा प्रश्न मंगेशला मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आला होता. मंगेशचं उत्तर होतं, " माझे आई - बाबा ".