मांडवात जेली फिश आल्याने मच्छिमार चिंतेत

मच्‍छीमार आणि पर्यटकांनी काळजी घ्‍यावी असे आवाहन मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागाकडून करण्‍यात आले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2017, 02:19 PM IST
मांडवात जेली फिश आल्याने मच्छिमार चिंतेत title=

रायगड : रायगड जिल्‍हयाच्‍या उरण, रेवस मांडवा परीसरात किनाऱ्यावर जेली फीश दिसू लागले आहेत. त्‍यामुळे मच्‍छीमारांमध्‍ये चिंतेचे वातावरण आहे. किनाऱ्यांवर दिसणाऱ्या जेलीफशिची संख्‍या खूप कमी असून वातावरणातील बदलामुळे ते किनाऱ्यांवर आले असावेत असा अंदाज आहे.
 
दसऱ्यापासून नवगावच्‍या किनाऱ्यांवर मोठया प्रमाणात विविध जातींचे मासे मोठ्या प्रमाणात दिसू लागले होते .आता जेलीफीश सारखे त्रासदायक जलचर दिसू लागले आहेत. जेली‍फीशचा स्‍पर्श मानवी अंगाला झाला तर खाज सुटते त्‍यामुळे मच्‍छीमार आणि पर्यटकांनी काळजी घ्‍यावी असे आवाहन मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागाकडून करण्‍यात आले आहे.

 हे ही वाचा 

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या निळाईचा उत्सव सुरू आहे. समुद्रात गेल्या काही दिवसांपासून या निळ्या पाहुण्यांचं आगमन झाले आहे. गोल बटणाच्या आकाराचे हे निळ्या रंगाचे जेलीफिश सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
या माशांचं शास्त्रीय नाव पॉर्पिटा पॉर्पिटा. हे सागरी मासे पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण आणि समशितोष्ण पाण्याच्च्या पट्ट्यात आढळतात. ब्ल्यू बटण जेलीफिश कोकणच्या किनाऱ्यांवर येणे हे मान्सून आगमनाचे शुभसंकेत समजले जातात. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे किनाऱ्यावर सहा वर्षापूर्वी असे जेलीफिश आढळले होते.
 रत्नागिरीतल्या भाट्ये बीचसह आरेवारे बीचवरही असे ब्लू बटण जेलीफिश लाखोंच्या संख्येने सापडतात. ब्ल्यू बटण जेलीफिश हे विषारी नसतात, पण तरीही त्यांना हात लावू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 
ब्ल्यू बटण जेलीफिशच्या आगमनामुळे कोकणच्या किनारे आणखी सुंदर दिसत आहेत. कोकणचा समुद्राकिनाऱ्याने निळाईचे रुप घेतले आहे.