हिंदी मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; लाइटमॅनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

Lightman Dies On The Sets Of Hindi Serials: विजेचा झटका लागून एका लाइटमॅनचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये ही घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 20, 2023, 03:29 PM IST
हिंदी मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; लाइटमॅनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू title=
Man electrocuted on shooting sets of daily soap serial in filmcity

Lightman Dies On The Sets Of Hindi Serials: गोरेगाव फिल्म सिटीत एका हिंदी मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. विजेचा झटका लागून एका सेटवरील एका लाइटमॅनचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सेटवर एकच खळबळ उडाली आहे. महेंद्र यादव असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी महेंद्र यादव याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तो एका हिंदी मालिकेच्या सेटवर काम करत होता तेव्हाच ही दुर्घटना घडली आहे. ही घटना घडताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असंही सुरेश गुप्ता यांनी नमूद केले आहे. 

मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये (फिल्मसिटी) एका हिंदी मालिकेचे शूटिंग सुरू होते. यावेळी लाइटमन महेंद्र यादवला विजेचा तीव्र धक्का लागला. विजेचा धक्का लागताच त्याला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले मात्र रुग्णवाहिकेतच महेंद्रचा मृत्यू झाला. 

महेंद्र यादव हा 28 वर्षांचा होता. त्याला काही दिवसांपूर्वीसुद्धा विजेचा धक्का लागला होता. त्यानंतर 19 सप्टेंबरला त्याला पुन्हा विजेचा धक्का लागला त्यातच त्याला जीव गमवावा लागला आहे. यापुर्वीही अनेक मालिकांसाठी लाईटमनचे काम केले होते. लाईटमनच्या मृत्यूनं सेटवरील सर्वांना याने धक्का बसला आहे. त्याला विजेचा धक्का कुठे आणि कसा लागला याबबात काही माहीती समोर आलेली नाही. 

निर्माता आणि मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसवर गुन्हा दाखल करण्यात यावा. मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी आणि फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कामगार आयुक्त यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा, अशी मागणी सुरेश गुप्ता यांनी केली आहे.