झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 24, 2024, 11:36 AM IST
झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद  title=

महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्याचा प्रकार घडला आहे. कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक आल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला. सिमरन मोटरचे मालिक कवलजीत सिंह बग्गा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. कवलजीत सिंह दररोज आपल्या मित्रांसोबत जिममध्ये एक्सरसाइज करायला जात असतं. व्यायाम करताना अचानक त्यांना झटका आला आणि ते खाली कोसळले. 

घटना CCTV मध्ये कैद 

कवलजीत सिंह बग्गा यांच्या मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये कवलजीत सिंह बग्गा हे आपल्या मित्रांसोबत जिममध्ये एक्सरसाइज करताना दिसत आहे. अचानक व्यायाम करताला कवलजीत सिंह यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. हा प्रकार संपूर्ण कॅमेऱ्यात कैद झाला. यामध्ये कवलजीत सिंह हे खाली कोसळताना दिसत आहे. ते खाली कोसळताच त्यांच्या मित्रांची धावपळ झाली. 

कुटुंबियांसाठी मोठा धक्का 

खाली पडल्यानंतर कवलजीत सिंह यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कवलजीत सिंह यांच्या निधनानंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

व्यायाम करताना का येतो हार्ट अटॅक 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, व्यायामशाळेत जाताना, मैदानी खेळ खेळतानाच नव्हे तर नृत्य करतानाही अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. हृदयविकाराच्या वाढत्या प्रकरणांची अनेक कारणे आहेत. कारण आजच्या जीवनशैलीतील बदलांमुळे रक्त गोठण्याची समस्या वाढली आहे. याशिवाय आनुवंशिकतेमुळेही व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. पण अनेकदा माणसाला त्याची कल्पना नसते. अशा स्थितीत जर एखादी व्यक्ती अचानक खूप धावू लागली किंवा खूप काम करू लागली तर अनुवांशिकतेमुळे त्याला अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि हृदयावर अधिक ताण येऊ शकतो. त्यामुळे अचानक जास्त व्यायाम आणि शारीरिक श्रम करणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.