योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला एटीएसकडून अटक

सोशल मीडिया डेस्कवर मेसेज पाठवत... 

Updated: May 25, 2020, 07:19 AM IST
योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला एटीएसकडून अटक  title=
योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला एटीएसकडून अटक

नाशिक : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून २० वर्षीय इसमाला ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिकमध्ये एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली. ज्याअंतर्गत सय्यद मोहम्मद फैजल अब्दुल वाहाब याला एटीएसनं रविवारी ताब्यात घेतलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोमती नगर पोलीस ठाणे लखनऊ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया डेस्कवर मेसेज पाठवत या इसमानं २५ वर्षीय कामरान अमिन खान याच्या सुटकेची मागणी केली होती. कामरानची सुटका न केल्यास वाईट परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार रहा अशी धमकीही त्यानं दिल्याचं कळत आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून एका पत्रकाच्या माध्यमातून याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली. याच माहितीच्या आधारे २० वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आलं. ज्यानंतर त्याला उत्तरप्रदेश एटीएफच्या ताब्यात दिल्याची माहिती नाशिक एटीएसकडून देण्यात आली. 

वाचा : घाम गाळून महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा राज्य सरकारकडून छळ- योगी आदित्यनाथ

 

अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप घुगे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता पाटील, पोलीस उपनिरिक्षक राजाराम सानप, हवालदार संपत जाधव, एजाज पठाण, अलीम शेख, युसूफ पठाण, सुदाम सांगळे, अभिजित बेलेकर, अजित गिते, दीपक राऊत, गोविंद जाधव व दहशतवादी विरोधी पथक, नाशिक युनिट यांनी अवघ्या २४ तासात ही कामगिरी करत आरोपींना गजाआड केलं. परिणामी या यशस्वी कारवाईसाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप देण्यात येत आहे.