पतंग उडवायला जाऊ दिलं नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाचा धक्कादायक निर्णय

मकर संक्रांतीच्या दिवशी जळगावात मन हेलावून टाकणाऱ्या 2 घटना, एका पतंगामुळे गमवला चिमुकला 

Updated: Jan 14, 2022, 04:52 PM IST
पतंग उडवायला जाऊ दिलं नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाचा धक्कादायक निर्णय  title=
प्रातिनिधिक फोटो

वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव : मकर संक्रांत आणि पतंग उडवणं याचा आनंद तर काही वेगळाच असतो. मात्र कोरोनामुळे आता पतंग उडवणं आणि सर्वांनी एकत्र जमण्यावर बंदी आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळून पतंग उडवण्याचे खेळ सुरू आहेत. जळगावात मकर संक्रांती दिवशी मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 

पतंग उडवण्यासाठी जाऊ दिलं नाही म्हणून 12 वर्षाच्या चिमुकल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने थेट आयुष्य संपवण्य़ाचा निर्णय घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली. 

जळगावातील कुसुम्बा भागात पतंग उडवताना 8 वर्षीय मुलाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने जळगाव जिल्ह्यासाठी संक्रांत क्रिक्रांत ठरली आहे. कांचननगर मध्ये आज मकर संक्रांत असल्यामुळे पतंग  उडवण्यासाठी जाऊ दिले नाही.

याचा राग मनात ठेवून झोक्याच्या दोरीनं गळफास घेऊन 12 वर्षांच्या मुलाने आपलं आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिीस ठाण्याचे कर्मचारी पुढील तपास करत आहे. 

दुसरीकडे जळगाव कुसुम्बा गावामध्ये आज पतंग उडत असताना पतंग विजेच्या तारांमध्ये अडकल्यामुळे हितेश पाटील 8 वर्षीय तरुणाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे आज मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.