Maharastra Weather Update: राज्यातलं हवामान अस्थिर झाल्याचं पहायला मिळतंय. राज्याच्या विविध भागात कुठं कडाक्याची थंडी पडलीय तर कुठं ढगाळ वातावरण आहे. हवामानातल्या चढउताराचा नागरिकांनाही त्रास होतोय. अशात ऐन रब्बीच्या हंगामात (Rabbi Seasons) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाकडून (IMD) 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. (Maharastra Weather Update heavy rain in several part of the state Farmers must take care of crops marathi news)
मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 24 जानेवारीला मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या टेन्शन वाढलंय. शेतकऱ्यांवर हिवसाळ्याचं संकट आलंय. ऐन थंडीत पाऊस पडला तर पिकांवर त्याचा काय परिणाम होईल? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असू शकतो. तसेच मावा, तुडतुड्या, लष्कर अळीचं संकट देखील वाढलंय. पावसामुळे चाऱ्याच्या उत्पादनावरही परिणाम होईल. ज्वारी (Sorghum), बाजरी (Bajri), मका (Maize), गहू (Wheat) पिकाच्या नुकसानीची भीती देखील व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय.
आणखी वाचा - Weather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा
दरम्यान, डिसेंबरच्या मध्यापासूनच महाराष्ट्रात थंडीची लाट पडली. अनेक दशकांचे रेकॉर्ड अचानक मोडू लागले. बोचऱ्या थंडीमुळे घशाचे आजार (Winter Health Care) बळावले. अशात ऐन थंडीत पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची (Maharastra Famers) चिंता वाढलीय. आयएमडीच्या अंदाजानुसार राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार आहे. तर, तापमानातही लक्षणीय घट होणार आहे. दिल्ली आणि नजीकच्या भागात पावसाच्या तुरळक सरी बरसतील, असा अंदाज आहे.