मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

Maharashtra Winter Update : साधारण दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागते. पण कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 26, 2023, 07:02 PM IST
मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट title=
maharashtra winter forecast mumbai pune nagpur minimum and maximum temperature will drop weather update

Mumbai Pune Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापणान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याची इशारा हवामान विभागाने दिला आहे. (maharashtra winter forecast mumbai pune nagpur minimum and maximum temperature will drop weather update)

मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर या शहरांमध्ये रात्रीच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे. पण मुंबईकरांना थंडीची हूडहुडी थंडीसाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. तर येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे. 

तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर भारतातील थंड भागातून ईशान्येचे वारे येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमानात घट होईल. सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी आर्द्रतेचं प्रमाण आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर पुढील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे. 

मुंबईत थंडी कधी पडणार?

तर 6 ऑक्टोबरला मान्सूनने मुंबईतून प्रस्थान केलंय. त्यानंतर दोन आठवडे शहरात कमालीची दमट उष्णता वातावरण होतं. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या थंडीच्या लाटेसाठी मुंबईला बराच काळ वाट पाहावी लागेल, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. 

मुंबईत लवकरच थंडीची लाट येण्याची चिन्हे वर्तविण्यात आली आहे. साधारणपणे डिसेंबरमध्ये जेव्हा तापमान 14-15 °C पर्यंत घसरते तेव्हा थंडीची घोषित केली जाते. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस मुंबईकरांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे. यानंतर रात्रीच्या तापमानाप्रमाणे दिवसाचे तापमानही घसरण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.