कुठे बर्फवृष्टी, तर कुठे पाऊस; तरीही थंडी गायब, तुमच्या शहरातील आजचं हवामान कसं असेल?

Maharashtra Weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. तर कुठे पाऊसही पडतोय. तरीहीदेखील थंडीचा पत्ता नाही. अशात हवामान विभागाने इशारा दिला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 6, 2024, 10:14 AM IST
कुठे बर्फवृष्टी, तर कुठे पाऊस; तरीही थंडी गायब, तुमच्या शहरातील आजचं हवामान कसं असेल? title=
maharashtra weather news cold wave rain kashmir snowfall imd weather latest updates in marathi

Maharashtra Weather Updates : देशभरातील हवामानात सतत बदल दिसून येतोय. उत्तरेकडील राज्यात बर्फवृष्टी होतेय. तर काही राज्यांमध्ये रिमझिम पाऊस पडतोय. अशा वातावरणातही थंडी गायब झाल्याच चित्र आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी जाणवणारा गारवा सकाळी सूर्यप्रकाशात गायब होतो आहे. हवामान विचित्र झाल्यामुळे अनेकांना आजारांनी गाठलं आहे. उत्तर भरातात थंडीची लाट कायम असून काही भागात आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हवामान खात्यानुसार हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज आहे. उत्तरेकडील थंडीमुळे महाराष्ट्रात काही भागात थंडी जाणवणार आहे. (maharashtra weather news cold wave rain kashmir snowfall imd weather latest updates in marathi)

राज्यात थंडी कधीपर्यंत?

यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा मुक्काम लांबलाय. 11 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर थंडी निरोप घेईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलाय. उत्तर भारतात विक्रमी थंडी राहिली. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. बुधवारपासून थंडीचा कडाका वाढू लागेल आणि तो 11 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलीये. त्यानंतर तापमानात वाढ होईल. कोकण मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टीनं कहर केलाय. जोरदार बर्फवृष्टी होत असल्यानं अनेक नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. भारतीय जवानांनी 16 नागरिक, 4 रुग्ण आणि एका लहान मुलाची सुटका केलीय. या सर्वांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षितस्थळी नेण्यात आलं.

हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजिवन विस्कळीत झालंय...बर्फवृष्टीमुळे लोकांना घरातच बंदिस्त राहावं लागतंय. सोलंगनाला घाटी परिसरात रस्ते बंद आहेत..त्यामुळे नागरिकांचं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय.
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये सततची बर्फवृष्टी सुरूये त्यामुळे केदारनाथ मंदिर बर्फात हरवून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मंदिराच्या आसपास बर्फाचा जाड थर साचलाय.

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एवढंच नाही तर पंजाब, हरियाणा आणि आसामच्या काही भागात दाट धुक्याची चादर पसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

मुंबईतील वायूप्रदूषण

मुंबईतील वायूप्रदूषणाची तक्रार आता अॅप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे. मुंबई महापालिकेनं तक्रार करण्यासाठी अँड्रॉईडवर मुंबई एअर असं अॅप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. या अॅप्लिकेशनवर विभागवार तक्रार नोंदवता येणार असून मुंबई हायकोर्टानं वायूप्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी वेबपोर्टल आणि अॅप विकसित करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्यानंतर हे करण्यात आलं आहे.