Maharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?

Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.  

सायली पाटील | Updated: May 4, 2023, 07:51 AM IST
Maharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?  title=
Maharashtra Weather Forecast yellow Alert issued amid rain predictions and monsoon like situation

Maharashtra Weather Forecast Latest News : महाराष्ट्रातील हवामानात होणाऱ्या बदलांची साखळी पुढील काही दिवस अशीच सुरु राहणार असून, राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ढगांच्या गडगडाटासह राज्यातील विदर्भ आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी जास्त असेल. विदर्भाला पावसाचा तडाखआ तुलनेनं जास्त बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.