राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; इथं वाढणार उकाडा... नेमका कोणता ऋतू सुरुये?

Maharashtra Weather News : अनेक भागांमध्ये वाढतोय उकाडा. कुठं करण्यात आली राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...   

सायली पाटील | Updated: Apr 4, 2024, 08:11 AM IST
राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; इथं वाढणार उकाडा... नेमका कोणता ऋतू सुरुये? title=
Maharashtra Weather Forecast news rain predictions in marathwada vidarbha latest updates

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान लक्षणीय प्रमाणात वाढलं असून, सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला आणि मालेगावसारख्या भागांमध्ये करण्यात आली आहे. इथं तापमान 42 अंशांच्या घरात असल्याचं पाहायला मिळालं. याव्यतिरिक्त सध्या बहुतांशी देशातून हवामान कोरडं राहणार असून, पुढील चार दिवस मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 एप्रिलपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भाता पूर्व भाग, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यातच उष्णतेच्या लाटाही राज्यात सक्रीय असल्यामुळं दिवसाप्रमाणं रात्रीच्या वेळीसुद्धा तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवली आहे. यादरम्यान ताशी 30 -40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला झापलं