Maharashtra Weather : पुन्हा अवकाळी संकट! 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सातत्याने पडत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट जारी केली. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

BGR | Updated: Mar 26, 2023, 08:27 AM IST
Maharashtra Weather : पुन्हा अवकाळी संकट! 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  title=
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : देशाच्या अनेक भागात गेल्या आठवड्याभरापासून वारंवार पाऊस पडत आहे. पाऊस आणि वारा  (rain and wind) यामुळे काही भागात दव निर्माण झाले असून, लोकांना मार्च महिन्यात थंडी ला सामोरे जावं लागत आहे. परिणामी वातावरणात (Weather Update ) अनेक बदल झाले आहेत. तर दुसरीकडे तापमानात अचानक बदल झाल्याने लोकांचे हाल होत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

आजचे हवामान कसे असेल 

शनिवारी आलेल्या वाऱ्यांनी मुंबईच्या (Mumabi Weather Update ) किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. मुंबईला मिळालेला  हा तापमानदिलासा पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात आर्द्रतेमुळे उकाडा जाणवू शकतो. मात्र तापमानात फारशी वाढ अपेक्षित नाही. उर्वरित राज्यात मात्र तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

वाचा: बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा...  

तर विदर्भातील काही भागांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. यामुळे बळीराजाची पुन्हा चिंता वाढली. काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बेजार केलं. गहू, हरबरा, मका, कांद्यासह फळबागांचे प्रचंड नुकसान केलं. अनेक ठिकाणी पीकं अक्षरश: जमिनीवर झोपली. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पडला. त्यामुळे शेतात जे काही होतं नव्हतं ते सारं उद्ध्वस्त झालं. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. शनिवारी दुपारनंतर अचानक अंधारून येत पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. असं असलं तरी शेतक-यांची मात्र चिंता वाढलीय. पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.  तर गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पाऊस बरसला. यामुळे भाजीपाल्यासह कडधान्य पीक धोक्यात येणार आहे. या भागात 4 दिवसांपूर्वीच झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाचे पंचमाने अजूनही सुरुच आहेत. त्यात या नव्या नुकसानीची भर पडण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. कांद्यावर करपा आणि मावा रोगाचा प्रभाव होतो. नाशिकमधल्या चितेगावच्या राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राकडून शेतकऱ्यांना रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी माहिती दिली जाते.