अकोला : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याच्या आदिवासी गाव नवी तलाईमध्ये पहिल्यांदाच वीज आल्याने नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाहीय. दोन दिवसांपुर्वी वीज आल्याने संपूर्ण गाव उजळून निघालं. यावर विश्वास ठेवणं गावकऱ्यांना कठीणं गेलं. अधिकाऱ्यांनी जेव्हा बल्ब लावले तेव्हा लोकांनी केक कापून आनंद साजरा केला.
नवी तलाईतील हे नागरिक पहिल्यांदा अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट बाघ परियोजनेच्या मुख्य क्षेत्रात राहत होते. तिथे देखील वीज नव्हती. २०१८ मध्ये त्यांना स्थलांतरित करुन नवी तलाई येथे आणण्यात आले. या गावात राहणारे ५४० जण पुनर्वसनापासून वंचित आहेत.
त्यांना आपले मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी देखील दुसऱ्या गावी जावे लागायचे. त्यांच्या घरातील हा अंधार २२ जुलैला संपला आणि पहिल्यांदाच वीज आली.
गावामध्ये वीज पोहोचण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता गोपाळ कोल्हे आणि विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी विडा उचलला होता. त्यांनी या मुद्द्यावर दबाव कायम ठेवला आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहीले. अमोल मितकरी यांनी आता हे गाव दत्तक घेतलंय.
गावात वीज पोहोचवणं आमचं कर्तव्य असल्याचं राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकाऱ्याने सांगितले. या गावात वीज पोहोचवायचे निर्देश मिळाले तसं त्यांची टीम कामाला लागली. आता प्रत्येक घरात वीज पोहोचलीय. यापुढे देखील गावाच्या विकासासाठी काम करत राहू असेही ते म्हणाले.