MUCBF Recruitment 2024 : बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन काढण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनालाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत अंतर्गत कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्कची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्युनियर क्लर्कच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापिठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराकडे एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ज्युनियर क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्षांदरम्यान असावे.
तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 1 हजार रुपये परीक्षा फी अधिक 18 टक्के जीएसटी असे एकूण 1180 रुपये भरावे लागतील.
ज्युनियर क्लर्क पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20 हजार 760 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे येथील महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक शाखांमध्ये नोकरी करता येणार आहे.
7 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी अर्ज दारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.