Job News : दसऱ्याच्या मुहूर्तावर मेगा भरतीची घोषणा; सरकारी बँकेत नोकरी शोधताय? पाहा ही बातमी

Job News : तुमचा नोकरीचा शोध इथं थांबणार.... 

Updated: Sep 22, 2022, 08:56 AM IST
Job News : दसऱ्याच्या मुहूर्तावर मेगा भरतीची घोषणा; सरकारी बँकेत नोकरी शोधताय? पाहा ही बातमी  title=
Maharashtra state and Government bank jobs recruitment

Job News : राज्यातील तरुण वर्गासाठी खुशखबर. कारण, नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवा वर्गासाठी (Eknath shinde, Devendra Fadnavis) शिंदे फडवणीस सरकार खास भेट घेऊन आलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून राज्यात विविध 75 हजार रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी दसराच्या मुर्हतावर म्हणजेच अवघ्या काही दिवसांनी मेगा भरतीची घोषणा करण्यात येणार आहे. 

मेगा भरतीसाठी विशेष संस्थाही सरकारकडून नेमण्यात येणार आहे. यासाठी संस्थेची निवड प्रक्रिया पुढील कॅबिनेट मध्ये पार पाडणार आहे. या मोगा नोकरभरतीअंतर्गत रेल्वे आणि केंद्रीय परीक्षांच्या धर्तीवर होणार पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

सरकारी बँकांमध्ये नोकरी हवीये? ही संधी सोडू नका... 
येत्या काळात सरकारी बँकांमध्ये 41 हजार पदांची भरती होणार आहे. सरकारी बँकांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे बँकांच्या रोजच्या कामकाजावर याचे थेट परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : तरुणांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! 5 हजारांहून जास्त जागांसाठी होणार भरती

याच धर्तीवर अर्थ मंत्रालयाने भरतीचा प्लॅन मागितला असल्याची माहिती मिळतेय. मागील 10 वर्षात बँक शाखांची संख्या वाढलीय. तर कर्मचाऱ्यांची संख्या मात्र सातत्याने घटली आहे.  दर 1000 ग्राहकांमागे केवळ 1 कर्मचारी असं सध्या हे प्रमाण आहे. 

बँकांमध्ये सध्या लिपीक आणि कनिष्ठांची संख्या कमालीची कमी आहे. या घडीला स्टेट बँक ऑफ इंडियात (State Bank of India) सर्वाधिक रिक्त जागा आहेत. त्यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँक (punjab national bank) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (indian overseas bank) यांत रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत.