अहमदनगर : shirdi saibaba : साई संस्थानवर राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून येत आहे. आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी वर्णी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अॅड. जगदीश सावंत यांची निवडण्यात आली आहे. (Maharashtra : Saibaba Sansthan Board of Trustees announced, NCP MLA Ashutosh Kale as President)
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ राज्य सरकारने जाहीर केले आहे. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी तर शिवसेनेचे जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थानच्या विश्वस्तपदी 12 जणांची निवड करण्यात आली आहे. यात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील मुंबईचे राहुल कनाल यांचाही समावेश आहे.
शिर्डी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी आणि पूर्णवेळ समिती नेमण्यासाठी न्यायालयाने 22 जूनची मुदत निश्चित केली होती. तसेच सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेक़डे असल्यामुळे साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद मिळावे म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ सुरु होती. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे प्रमुख सत्यजीत तांबे हे ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली.
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, जयंत जाधव ,सचिन गुजर, डॉ. एकनाथ गोंदकर, राहुल कनाल, सुहास आहेर, अनुराधा आदिक, व अविनाश दंडवते यांचा समावेश करण्यात आला आहे.