Rain in Maharashtra : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. (Rain News) मान्सूनचा परतीचा प्रवासानं वेग घेतला आहे. (Maharashtra Monsoon) मात्र, असे असले तरी परतीचा प्रवास लांबला आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत पावसाच्या (Rain) हलक्या सरींची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली. मात्र, त्याचवेळी दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला.
परतीचा पाऊस लांबण्याची अनेक कारणे आहेत. समुद्राचे वाढलेले तापमान, कमी दाबाचा पट्टा तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बांधकामे जास्त झाली आहेत. त्यामुळे तापमान सुद्धा जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टे तयार होतात. याचा थेट परिणाम हा पावसावर झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात गेल्या दोन ते दिवसांपासून विविध ठिकाणी परतीच्या पावसानं (Rain) जोरदार झोडपून काढले. या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे. या पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, त्याचवेळी राज्यातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलेच झोडपले. अनेक जिल्ह्यात नदी नाले दुधडी भरुन वाहत होते. तर काही ठिकाणू पूर आला. पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर पुण्यात कधी नव्हे तो जोरदार पाऊस झाला. याचा फटका अनेक नागरिकांना बसला. मुसळधार पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.