Maharashtra Politics : 40 आमदारांना एकत्र घेऊन शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काही महिन्यांपूर्वी मोठा धक्का दिला होता. यानंतर राज्यात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) अशा दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली आणि राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार कोसळलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या (BJP) साथीने राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच शिवसेना असल्याचा निर्णय दिला. तसेच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव देखील शिंदे गटाला बहाल केले आहे.
या निर्णयानंतर ठाकरे गटामध्ये कमालीची संतपता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी शेण खाल्ल अशा शब्दात टीका केली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयासाठी 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. दुसरीकडे आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कधीही एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा एमआयएमचे प्रमुख व खासदार असुदुद्दिन ओवैसी यांनी केला आहे. असुदुद्दीन ओवैसी यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
एमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना ओवैसी यांनी हा दावा केला आहे. हे लोक म्हणतात की देशातली धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे. मात्र इथे कोणती धर्मनिरपेक्षता आहे, मला सांगा. शिवसेना हा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे का? तो पक्ष कधीपासून धर्मनिरपेक्ष झालाय हे मला सांगा. शिवसेना पक्ष धर्मनिरपेक्ष झाला, हे राहुल गांधी सांगू सांगतील का? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम आणि श्याम यांच्या जोडीसारखे आहे. ते कधीही एकत्र येऊ शकतात," असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.
भाजपचा मुस्लिमांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही - ओवैसी
मुस्लिमांमधील पसमांदा मुस्लीम समाजाला जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी त्यांच्या अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील धोरणामुळे मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असाही दावा ओवैसी यांनी केला आहे.