महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा?

वरळी म्हणजे मुंबईतला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ.. कारण वरळीचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे.. मात्र याच वरळीत आता आदित्य ठाकरेंना दादांचा म्हणजे अजित पवारांचा आमदार टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली

वनिता कांबळे | Updated: Aug 23, 2024, 09:36 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा? title=

Maharashtra Politics :  आदित्य ठाकरेंच्या वरळीत लागलेले हे बॅनर्स... वरळी विधानसभेवर पुन्हा घड्याळ... वरळीतील संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी.. असा उल्लेख या बॅनरवर आहे...  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिका-यांनी वरळी मतदारसंघात अमोल मिटकरींचे बॅनर्स लावले आहेत.. वरळी मतदारसंघात अमोल मिटकरी हे वरळीचे आमदार असतील असा उल्लेख त्यात आहे... 

राष्ट्रवादी एकसंध असताना सचिन अहिर यांनी वरळीचं प्रतिनिधित्व केलं होतं. शरद पवारांनी सचिन अहिर यांना वरळीतून उमेदवारी दिली होती आणि निवडूनही आणलं होते. वरळीतून निवडून आलेल्या सचिन अहिर यांना मंत्रिपदाचीही संधी दिली होती.
विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काहीच महिने उरले आहेत.. सर्वच राजकीय पक्ष तयारीत लागले आहेत.. त्याच दृष्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंबईत हात पाय पसरण्याची रणनिती आखलेली दिसतेय.. अजित पवारांनी याआधीच मुंबईत जनसन्मान यात्रा काढली होती.. आता वरळीतही घड्याळवाला आमदार पाहिजे अशी इच्छा राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची दिसतेय.. 

वरळीत विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे... विधानसभेला आदित्य ठाकरेंविरोधात लढण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडेंनी तयारी सुरु केलीय. याच वेळी अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचे बॅनर्स वरळीत लागले आहेत. मनसेचा आणि अमोल मिटकरींचा राडा सर्वांनीच पाहिला होता.. राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला अमोल मिटकरींची गाडी फोडत मनसैनिकांनी उत्तर दिलं होतं..

आता या राड्यानंतर ज्या मतदारसंघात मनसे निवडणूक लढवण्याची तयारी करतेय.. त्याच वरळी मतदारसंघात अमोल मिटकरींचे बॅनर्स लागलेत. त्यामुळे वरळीवर राष्ट्रवादीचा अजित पवार गट दावा करणार का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा निर्णय रखडलाय.. आमदारांच्या नियुक्तीबाबत 1 ऑक्टोबरपर्यंत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय..