Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा!

Maharastra Politics: आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. 

Updated: Feb 3, 2023, 08:26 PM IST
Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा! title=
ajit pawar vs nana patole

Ajit Pawar vs Nana Patole : नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये (Nashik Graduate Constituency) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वत: प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा वाद उद्भवल्याचं पहायला मिळतंय. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) दादा नाना आमने सामने आल्याचं पहायला मिळतंय. (Maharashtra Politics ajit pawar vs nana patole over satyajeet tambe victory in Nashik Graduate Constituency latest Marathi News)

सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मदत केली. शरद पवार यांनी मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांना फोन करून तांबेंना नाशिकमधून उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता, असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये (MVA) भांड्याला भांडं लागल्याचं पहायला मिळतंय. सत्यजीत तांबे यांनी फार ताणू नये आणि काँग्रेसनेही मनाचा मोठेपणा दाखवावा, असा सल्ला देखील पवारांनी यावेळी दोघांना दिला होता. त्यामुळे  सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटणार की नाही? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. काँग्रेसच्या घरात काय चाललं आहे याची अजित पवार यांना कल्पना नाहीये, त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं असावं, असं नाना पटोले (Nana Patole On Ajit Pawar) यांनी म्हटलंय. अजित पवारांनी टीआरपीसाठी स्टेटमेंट केल्याचं म्हणत नानांनी दादांवर आगपाखड केली.

आणखी वाचा - Maratha Reservation: मराठा उमेदवारांना पुन्हा झटका; EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा

दरम्यान, राष्ट्रवादीने शुभांगी पाटलांना (Shubhangi Patil) विजयासाठी मदत केली असती तर त्या निवडून आल्या असत्या, असं म्हणत नाना पटोले यांनी वादावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (Pune by elections) आढावा घेतला, त्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जयतं पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.