राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

सायली पाटील | Updated: Jul 10, 2023, 10:49 AM IST
राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट  title=
Maharashtra Political News ncp mla Rohit Pawar Emotional Post post ajit pawar rebel n party

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

पक्षांतर्गत बंडानंतर पवारांच्या सभा असो किंवा त्यांचा एखादा दौरा असो, अगदी पत्रकार परिषदाही असो. रोहित पवार यांनी वेळोवेळी आजोबांची साथ देत या कठीण काळात त्यांना साथ दिली. कुटुंब, भूक-तहान विसरून रोहित पवारही पक्षबांधणीच्या काळात शरद पवार यांना साथ देताना दिसले. यारम्यानच जवळपास पाचएक दिवसांनी ते घरी परतले तेव्हा तिथं त्यांनी जे काही अनुभवलं ते पाहता त्यांना काही शब्दच सुचेना. अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या भावनिक क्षणावर रोहित पवार यांनी प्रकाशझोत टाकला. 

हेसुद्धा वाचा : जरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्... 

 

आपण घरी पोहोचताच नेमकं काय घडलं हे मुद्दाम सर्वांना सांगत आहोत, असं लिहितच त्यांनी पोस्टची सुरुवात केली. त्यांनी लिहिलं, 'नेहमीप्रमाणे आज सकाळी घरी गेल्या गेल्या मुलं धावतच जवळ आली… मला घट्ट पकडलं… मलाही त्यांच्या त्या स्पर्शाचं समाधान नेहमीपेक्षा अधिकच वाटलं.. त्यांना जवळ घेऊन बोलत असताना मुलाने प्रश्न केला… डॅडा ५ दिवस झालेय कित्ती वाट पाहतोय तुझी.. कुठं गेला होता? त्याच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं.. बाहेर होतो बाळा….अडचण होती जरा…
 ‘‘काय अडचण झाली डॅडा?’’ त्याचा पुढचा प्रश्न.
मी - ‘‘आपल्या संघटनेत जरा अडचण आली होती.”
तो - ‘‘काय अडचण आली होती?’’
निरागसपणे एकामागून एक असे अनेक प्रश्न विचारणं त्याचं चालूच होतं.'

मुलाच्या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यावं हेच रोहित पवार यांना कळेना. घरात राजकारण न आणणाऱ्यांपैकी मी एक असं म्हणताना हा प्रसंग मात्र त्याला अपवाद होता ही वस्तुस्थितीसुद्धा त्यांनी मांडली. 

आता कुटुंबात फूट पडते का...

संघटनेत पडलेली ठिणगी पाहता आता कुटुंबात फूट पाडते का, अशी चिंता रोहित पवार मुलापुढं बोलून दाखवणार तितक्यातच त्यांनी शब्द आवरते घेतले. त्यांच्या तोंडातून एकही शब्द उमटेना. मुलांच्या प्रश्नांनी त्यांना निरुत्तर केलं होतं. पण, राजकीय धुमश्चक्रीतून घरी परतल्यानंतर या चिमुकल्यांनी दिलेला आधार त्यांना लाखामोलाचं बळ देणारा होता हे मात्र नक्की!