शिवसेनेचे अनेक आमदार भाजपच्या ताब्यात, राऊत यांचा गंभीर आरोप

Maharashtra Political Crisis: आताची मोठी बातमी. राज्यातील राजकीय घडामोडीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  

Updated: Jun 23, 2022, 11:20 AM IST
शिवसेनेचे अनेक आमदार भाजपच्या ताब्यात, राऊत यांचा गंभीर आरोप title=

मुंबई : Maharashtra Political Crisis: आताची मोठी बातमी. राज्यातील राजकीय घडामोडीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे  17 ते 18आमदार भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

काल रस्त्यावर दिसले ते खरे शिवसैनिक, तो खरा पक्ष, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संपर्कात असलेले 20 आमदार परत येतील आणि घडलेला प्रसंग सांगतील, असे राऊत म्हणाले. ईडीच्या कारवायांना घाबरुन आणि आमिषांना भुलून हे आमदार पळाले, असा आरोप त्यांनी केला आहे.  मी माझ्या पक्षाबद्दल बोलणार आहे. आजही आमचा पक्ष मजबूत आहे. सुमारे 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मुंबईत आल्यावर तुम्हाला कळेल. लवकरच कळेल, कोणत्या परिस्थितीत, दबाव आणून हे आमदार आम्हाला सोडून गेले, असे संजय राऊत म्हणाले.
 
मी भाजप हाच शब्द वापरत आहे. त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपाशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवले जाऊ शकत नाही. जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही, असेही  राऊत म्हणाले आहेत.

EDच्या किंवा अन्य काही अमिषाला बळी पडून आमदार पळाले असतील.  काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हा पक्ष अद्याप मजबूत आहे. चार आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असा होत नाही, असा दावा राऊत यांनी केला.