Aurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू

Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं

Updated: Dec 26, 2022, 01:25 PM IST
Aurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू title=

Aurangabad Crime: : औरंगाबाद जिल्ह्यात अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर येतेय. गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे, आणि यात धक्कादायक म्हणजे त्या महिलेच्या पतीनेच तिला या गोळ्या खाऊ घातल्याचं समोर आल्याने आणखी संताप वाढला आहे. (woman dies after overdose of abortion pills in maharashtra aurangabad) 

औरंगाबाद मधील फुलंब्री तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे, या संपूर्ण प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली क्षीरसागर असं या महिलेचं नाव आहे,

वैशाली यांचं बाळासाहेब क्षीरसागर या व्यक्तीसोबत गेले काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसातच वैशाली याना दिवस गेले मात्र तिचे पती म्हणजेच बाळासाहेब यांना हे मूल नको होतं, आणि यासाठीच आरोपी पटीने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या,

पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस (overdose of pills) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं

आणि यातच तिचा मृत्यू झाला .  यासंदर्भात पोलिसांना कळताच अधिक तपास करत पोलिसांनी राहत्या घरातून वैशालीच्या पती बाळासाहेब अटक केली आहे. आरोपी पतीविरोधात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे      (Woman Dies After Overdose of Abortion Pills )

सुरक्षित गर्भपात करता येतो याबद्दल समाजात अजूनही पुरेशी माहिती नाही. माहितीच्या अभावी अनेकदा घरगुती उपचार, गोळ्या घेऊन गर्भपाताचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे महिलांच्या जिवाला धोका निर्माण होतो. (lack of awarness of abortion pills, contraceptive pills)

नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक पर्याय आहेत (unwanted preganancy)

सध्याच्या घडीला मर्यादित कुटुंब हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे बर्थ कंट्रोल करणं शक्य आहे. जेणेकरून जोडपं त्यांच्यानुसार हव्या त्या कॉन्ट्रासेप्टिव्स पद्धतीनी निवड करू शकतात. जाणून घेऊया  कॉन्ट्रासेप्टिव्सच्या विविध पद्धती.

बॅरियर मेथड
बॅरियर मेथडच्या अंतर्गत स्पर्मला एग्जपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात येतं. यासाठी एक बॅरियर तयार केलं जातं. बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्सचं उदाहरण म्हणून कंडोम वापरण्यात येतं.

इंट्रायूटेराइन डिवायसेस 
हे छोटे डिव्हाईस असतात जे प्रोफेशनल्सच्या माध्यमातून यूट्रसमध्ये सोडण्यात येतात. हे डिव्हाईस यूट्रस म्हणजेच गर्भाशयात अंड्याचं फर्टीलायाझेशन होण्यापासून रोखतं. ही एक कॉन्ट्रासेप्शनची प्रभावी पद्धत मानली जाते.

हार्मोनल बर्थ कंट्रोल मेथड
कॉन्ट्रासेप्शनच्या या पद्धतीमध्ये ओव्यूलेशनची प्रक्रिया रोखली जाते किंवा एग फर्टिलायझेशनची प्रक्रिया रोखली जाते. यासाठी बर्थ कंट्रोल पिल्स दिल्या जातात. गर्भनिरोधकाच्या या गोळ्यांमध्ये हार्मोन्सचं कॉम्बिनेशन असतं.

आतात्कालीन कॉन्ट्रासेप्शन
सुरक्षित लैंगिक संबंधानंतर अनवॉन्टेड प्रेग्नेंसीपासून बचाव करण्यासाठी आतात्कालीन कॉन्ट्रासेप्शनच्या पद्धतीचा वापर केला जातो. दरम्यान या पद्धतीचा फार दुरुपयोग केला जातो. या पद्धतीचा फक्त आतात्कालीन परिस्थितीत वापर केला पाहिजे. असुरक्षित लैंगिक संबंधांच्यानंतर हे औषधं 72 तासांच्या आत घेतलं पाहिजे. कारण याच काळामध्ये शरीरात ओव्हुलेशनची प्रक्रिया सुरू होते.