'१० कोटी द्या नाहीतर सरकारी कार्यालयांवर बॉम्बस्फोट', राज्यातील धमकीच्या मेलमुळे उडाली खळबळ

अनेक सरकारी कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची आमची तयारी असल्याची धमकी त्यांच्याकडून दिली गेली.

Updated: May 24, 2021, 04:47 PM IST
'१० कोटी द्या नाहीतर सरकारी कार्यालयांवर बॉम्बस्फोट', राज्यातील धमकीच्या मेलमुळे उडाली खळबळ title=

नांदेड : कोरोनाकाळात राज्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तिने एका मेल मध्ये असे लिहले की, मला दहा कोटी रुपये द्या, अन्यथा नांदेडचे जिल्हादंडाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांवर बॉम्बने हल्ले होतील. त्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला आणि भितीचे वातावरण तयार झाले आहे. परंतु रविवारी 23 मे ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशा धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीला अटक केले आहे. ज्यामुळे नांदेडमधील लोकांच्या जिवात जीव आला आहे.

माहितीनुसार आरोपींविरोधात वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची आमची तयारी असल्याची धमकी त्यांच्याकडून दिली गेली. या धमकीसह त्यांनी स्फोट करणार असलेल्या कार्यालयांच्या नावाची यादीही जोडली होती.

8 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर हा मेल आला, या मेलमध्ये असे लिहिले होते की, 10 कोटी रुपये द्या नाहीतर जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि अन्य महत्वाची कार्यालये तसेच संपूर्ण नांदेड शहरावर बॉम्बहल्ले होतील.

आरोपीला असे पकडले

मेल पाठवलेल्या आरोपीचे नाव शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ असे आहे. 35 वर्षांचा अब्दुल रऊफ हा व्यवसायाने व्यापारी आहे. तो नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरच्या आगापुरा भागातील रहिवासी आहे. पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या प्रयत्नांनी त्याला अटक करण्यात यश आले.

आरोपीविरोधात वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे आतंकवादी संघटनेचा कट आहे का? की आणखी काही कारण आहे का? याचा तपास सध्या सुरु आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर 8 मे रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास एक मेल आला. या मेलमध्ये असे लिहिले होते की, 10 कोटी रुपये द्या नाहीतर जिल्ह्यातील जिल्हादंडाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि अन्य महत्वाची कार्यालये तसेच संपूर्ण नांदेड शहरावर बॉम्बहल्ले होतील. या मेलमध्ये एकूण 125 ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीचा उल्लेख केला आहे.

पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. बिपिन, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी धमकी देणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.