Maharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार

 Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.  

Updated: Dec 22, 2022, 01:36 PM IST
Maharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार title=
Maharashtra-News

Maharashtra Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोल यांनी राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सरकार पळ काढत असल्याने आम्ही निषेध करत आहोत, असे पवार, पटोले म्हणाले. (Political News in Marathi)

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भूखंडावरुन गंभीर आरोप 

दरम्यान, विधानसभेत फोन टॅपिंगप्रकरणावरुन गदारोळ झाला. सरकार रश्मी शुक्लांना पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावेळी विरोधकांचा सभात्याग केला. अधिवेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना गरिबांसाठी घरे देण्याच्या उद्देशाने संपादित केलेल्या भूखंडावरुन त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. नागपुरातील कोट्यवधी रुपयांचा भूखंड बिल्डरांना कमी किमतीत दिल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप आहे.  यावरुन विरोधकांनी चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, नगर विकास खात्याचे अॅफिडेटीव्हसमोर आल्याने मुख्यमंत्री उघडे पडतील म्हणून जाणून जनहिताचे विषय दुर्लक्षित केले जात आहेत, असा आरोप विरोधकांनी केला.

'सरकार पळ काढत आहे, सरकारचा निषेध'  

आम्ही विरोधक, सरकारचा पळ काढत असल्याने निषेध करत आहोत. आम्ही विधिमंडळ काम सुरळीत व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत. मात्र सत्ताधारी गोंधळ घालून अधिवेशन तहकूब वारंवार करत आहेत. रिया चक्रवर्ती हिने आत्महत्या केली, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. असे असतांना उगाच गोंधळ घालनायचा कार्यक्रम सुरु आहे. इतर भूखंड घोटाळा , फोन टॉपिंग सह अनेक समस्याच मांडायच्या आहेत. मात्र जुने विषय काढून स्वतःच गोंधळ करतायेत. आम्हाला बोलू दिले जात नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला.

जाणून तालिका अध्यक्ष बसविले जात आहेत. सत्ताधाऱ्यांचा विश्वास सीबीआयवर नाहीये का ? लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्यासाठी सर्व गोंधळ करणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचे प्रकरण लक्ष वळविण्यासाठी हे केले जातेय
जनतेने हे लक्षात घ्यावे. सत्ताधारी पक्ष केंद्राच्या धोरणाबाबत राज्याकडे खुलासा मागत आहेत. विरोधी पक्ष आमहाला बोलायला संधी देत नाहीत, असा हल्लाबोल आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या शब्दाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे किंमत देत नाहीत हे त्यांच्या विधानावरुन दिसून येत आहे. एक इंच जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भाषा बोम्मई यांनी केली होती.

फोन टॅपिंग प्रकरणावरुन विधानसभेत विरोधक आक्रमक 

फोन टॅपिंग प्रकरणावरुन विधानसभेत आज विरोधक आक्रमक झाले. सभेत वेलमधून येऊन विरोधकांनी घोषणाबाजी केली. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग विषयी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून आज फोनटॅपिंग प्रकऱणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र चर्चेची मागणी फेटाळल्यामुळे वेलमध्ये येत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला. सत्ताबदल झाल्यावर रश्मी शुक्ला यांच्याबाबत क्लोजर रिपोर्टवरून नाना पटोलेंनी गृहमंत्र्यांचा यात सहभाग असल्याचा आरोप केला. तर पोलीस अधिका-यांना पाठिशी घालण्याचं कारण काय असा सवाल अजित पवारांनी केला. 

दरम्यान, दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणेंनी केली. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी केलीय.