Maharashtra Weather : (Monsoon) मान्सून अवघ्या काही दिवसांवर असतानाच आता राज्यातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. घराती मोठी मंडळी हा उकाडा पाहता येत्या दिवसांत पाऊस चांगलाच जोर धरणार असा अंदाज वर्तवताना दिसत आहेत. तिथं हवमान विभागानं मात्र तूर्तास असा कोणताही अंदाज दिला नसून यंदाचा मान्सून सर्वसाधारण असेल याच मतावर ते ठाम आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून (Maharashtra) महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या फरकानं तापमानवाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्याच्या किनारपट्टी भागातही (Heat Wave) उष्णतेचा दाह अधिक जाणवू लागला आहे. किंबहुना येणाऱ्या काही दिवसांत हा दाह आणखी प्रभावी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
विदर्भ (Vidarbha) आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असल्या तरीही सध्याचं हवामान पावसासाठी पूरक असल्यामुळं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तत्सम परिस्थिती उदभवू शकते.
कर्नाटकचा अंतर्गत भाग ते केरळचा उत्तर भाह या अंतरामध्ये समुद्रसपाटीपासून साधारण 900 मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्री झाला आहे. ज्यामुळं राज्यात तापमानात वाढ नोंदवली गेली करीही उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला पाऊस ओलाचिंब करू शकतो.
देश पातळीवर हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास हिमालयाच्या पश्चिमेला आणखी एक पश्चिमी झंझावात सक्रीय आहे. ज्यामुळं दिल्लीसह देशातील बहुतांश मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. शिवाय 24 ते 27 मे या कालावीत देशातील उत्तरेकडील राज्य, सिक्कीम, झारखंड या भागांमध्ये जोरदार पर्जन्यमानाचा अंदाज आहे. .
आज उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये धुळीचं वादळ येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश बिहारचा उत्तर भाग, ओडिशा, पश्चिम बंगाल या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील.
सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांसह देशातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसानं हजेरी लावली असली तरीही हा मान्सून नाही ही बाब लक्षात घ्यावी. काही दिवसांपूर्वीच अंदमानाच नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दाखल झाला. पण, मंगळवारी मात्र मान्सूनची वाटचाल मंदावली. त्यामुळं येत्या काळात तो बंगालचा उपसागरामध्ये व्याप्ती करताना दिसेल. केरळात येण्यासाठी त्याला काहीसा उशीर होऊ शकतो हेसुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं.