राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९,६१५ रुग्ण वाढले, २७८ मृत्यू

महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ पाहायला मिळाली.

Updated: Jul 24, 2020, 09:31 PM IST
राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९,६१५ रुग्ण वाढले, २७८ मृत्यू title=

मुंबई : महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसभरात कोरोना रुग्णांमध्ये ९,६१५ ने वाढ झाली आहे, तर २७८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३,५७,११७ एवढी झाली आहे. यातले १,९९,९६७ रुग्ण बरे झाले आहेत, तर सध्या राज्यात १,४३,७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के एवढं झालं आहे. 

महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोरोनामुळे १३,१३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ३.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज झालेल्या २७८ मृत्यूंपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक ५४ मृत्यू झाले आहेत. तर पुणे मनपा क्षेत्रात ४९ मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये १७ मृत्यू, कल्याण-डोंबिवली १३, नवी मुंबईमध्ये १० मृत्यूंची नोंद झाली आहे. 

मुंबईमध्ये आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १,०६,९८० एवढी झाली आहे. यातले ७८,२५९ रुग्ण बरे झाले आहेत, तर २२,४४३ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ५९८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यामध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात ८३,१८९ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी ४३,७७७ रुग्ण बरे झाले आहेत, तर ३७,१६२ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे २२४९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ६९,९१९ पर्यंत पोहोचला आहे. यापैकी २४,४१५ बरे झाले आहेत, तर ४३,८३८ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. पुण्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १६६६ जणांना प्राण गमवावा लागला आहे.