पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर!

अहमदनगर जिल्ह्यात यंदा महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. 

Updated: Dec 8, 2022, 10:47 PM IST
पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर! title=

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन कुठे होणार याची उत्सुकता राज्यभरातील मल्ल आणि कुस्ती शौकिनांना लागली होती. अहमदनगर जिल्ह्यात यंदा महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे.  ही स्पर्धा 25 ते 31 डिसेंबर दरम्यान वाडिया पार्क मैदानात खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजत आहे. (Maharashtra Kesari Wrestling Tournament Date Announced latest Marathi News)

अहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरीचे आयोजक आमदार संग्राम जगताप असणार आहेत. डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी होण्याची शक्यता आहे. कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर होत नव्हती अखेर तारीख जाहीर झाली आहे. संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप तसेच संयोजन सचिव संतोष भुजबळ यांनी दिली आहे.

गतविजेता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील गतउपविजेता विशाल बनकर ठरले होते. पृथ्वीराजने गंगावेसचाच सिकंदर शेख, महान भारत केसरी माऊली जमदाडे यांचा पराभव करत 19 वर्षी महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेवर आपलं नाव कोरलं होतं. कुस्तीचं पंढरपूर असणाऱ्या कोल्हापूरकडे कित्येक वर्षांनी केसरी गदा गेली होती.